
सहसंपादक : रामभाऊ भोयर
राळेगाव तालुक्यातील पिंपळखुटी गावामध्ये दिनांक 27 मे 2025 रोज मंगळवारला संबोधी बौद्ध विहारात तथागत गौतम बुद्धाच्या मूर्तीची स्थापना अमरावती जिल्ह्याचे मा. खासदार बळवंतराव वानखडे यांच्या हस्ते स्थापना करण्यात आली. कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रशांतभाऊ तायडे, माजी सभापती पंचायत समिती, राळेगाव, काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते भैय्यासाहेब गावंडे यांनी खासदार वानखडे यांचे शाल श्रीफळ देऊन स्वागत केले. खासदार वानखडे यांनी तथागत बुद्धांचे विचार लोकांना सांगितले त्यानंतर भैय्यासाहेब गावंडे आपले विचार मांडले. यानंतर प्रशांत भाऊ तायडे यांनी आपले विचार मांडले. त्यानंतर पिंपळखुटी येथील 350 वर्ष जुन्या प्राचीन काळातील अवधूत महाराज मंदिरात जाऊन वानखडे साहेबांनी दर्शन घेतले. व मूर्तीची पूजा केली . अवधूत महाराजांना हार चढवून त्यांच्या झेंड्याला सुद्धा हार चढविला आणि दर्शन घेतले. त्यानंतर खासदार साहेबांनी नानाजी मोकडे यांच्या घरी जाऊन चहा पाणी घेतले. या कार्यक्रमाला डॉ. कुणाल भोयर, मंगेश राऊत नगरसेवक, बाळू धुमाळ, नगरसेवक,बबनराव झलके इत्यादी मान्यवर कार्यक्रमाला उपस्थित होते. या कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणात नागरीक व महिलावर्ग सुद्धा उपस्थित होत्या. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सागर गावंडे यांनी केले.
