स्टेट बँकेच्या मनमानी कारभाराविरोधात आजाद समाज पार्टी आक्रमक (डफली बजाओ आंदोलनाचा इशारां)


ढाणकी प्रतिनिधी:: प्रवीण जोशी


स्टेट बँक प्रशासनाकडून ग्राहकांना योग्य ते सोयीसुविधा मिळत नसल्यामुळे ग्राहकांची हेळसांड होत असलल्याने विविध मागण्यासाठी आजाद समाज पार्टीतर्फे ढाणकी येथील स्टेट बँक प्रशासनाला दिनांक १३ सप्टेबर रोजी निवेदन देण्यात आले,
स्टेट बँकेत स्वच्छतागृह असून दर्शनी भागावर बँकेच्या बाहेर ग्राहकांसाठी स्वच्छतागृहाची व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे अशी माहिती लिहिण्यात यावी,
बँक स्थित एटीएम मशीन बँकेच्या बाहेर बसूवून ग्राहकांना एटीएमची २४ तास सेवा द्यावी,
बँकेत मागील काही दिवसापासून ग्राहकांचे पैसे चोरी जाण्याच्या घटना घडत असल्यामुळे बँकेत दोन सुरक्षारक्षकाची तात्काळ नेमणूक करावी,
बँकेत दोन कॅश काऊंटर सुरू करण्यात यावे एक पैसे भरण्यासाठी दुसरे पैसे काढण्यासाठी,
ई केवायसी साठी ग्राहकांची होणारे पिळवणूक त्वरित थांबून प्रलंबित असलेल्या व नवीन ई केवायसी तात्काळ पूर्ण करण्यात याव्या, स्टेट बँक अधिकारी व कर्मचाऱ्यांनी ग्राहकांसोबत आरेरावी व मुजोरीची भाषा न करता त्यांना सन्मानाची वागणूक देऊन त्यांच्या समाधान कराव,
कॅश काउंटर वेळेत सुरू कराव या मागण्या निवेदनात नमूद करण्यात आल्या आहेत सदर
मागण्या तातडीने दहा दिवसाच्या आत मंजूर कराव्यात मागण्या मंजूर न झाल्यास बँक प्रशासनाच्या विरोधात स्टेट बँकेसमोर डफडी बजाव आंदोलन छेडण्याचा इशारा, आजाद समाज पार्टीचे शहराध्यक्ष गोलू भाऊ मुनेश्वर , युवा अध्यक्ष समाधान नरवाडे यांच्या नेतृत्वात जिल्हाध्यक्ष प्रशांत उर्फ जॉन्टी विणकरे यांच्या मार्गदर्शनाखाली , उपाध्यक्ष आबा गायकवाड महासचिव समाधान राऊत, सचिव शेख चांद शेख कासम, शेख अब्दुल उर्फ लारा, बाळू वाडेकर, मुंशीफ शेरा, बंडू काळबांडे, यांनी दिला