दिग्दर्शक अनिकेत परसावार यांची नाटक व चित्रपट कार्यशाळा संपन्न

आवळपुर : आज कालच्या युवांन मध्ये अभिनय व कला क्षेत्रात काम करण्याची इच्छा खूप प्रमाणात वाढू लागली आहे. पण नेमकं या क्षेत्रात दाखल कसं होतात? येथे काम कसं मिळतो? कोणाला किती मानधन असते? या क्षेत्रातील शिक्षण कुठे मिळतं? हे योग्य मार्गदर्शन मिळत नाही. अपूर्ण मार्गदर्शनामुळे कित्येक युवा कलाकारांची दिशाभूल होते. युवा कलाकारांना ते योग्य मार्गदर्शन मिळावं आणि त्यांचं भविष्य कला क्षेत्रात घडावं म्हणून आवळपुर येथील अदित्य बिरला पब्लिक स्कूल मध्ये दोन दिवसीय नाटक व चित्रपट निर्मिती कार्यशाळा २६ आणि २७ मे 2023 रोजी घेण्यात आली. युवा दिग्दर्शक तसेच लेखक व कवी अनिकेत परसावार याच्या उपस्थितीत कार्यशाळेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या कार्यक्रमाचे आयोजन अल्ट्राटेक कम्युनिटी वेल्फेअर फाउंडेशन येथील प्रतीक वानखेडे, सचिन गोवरदीपे व अमित तिफने यांनी केले. या मध्ये दिग्दर्शक अनिकेत परसावार यानी चित्रपट व नाटक लिखाण, कॅरेक्टर आणि ऑब्झर्वेशन, ऑडिशन कसे द्यायचे, अभिनय कसा करायचा, अभिनयाचे ९ रस ही सर्व माहिती कार्यशाळेत त्यांनी दिली. या कार्यशाळेमध्ये एकुण ५० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. दिग्दर्शक अनिकेत परसावार सध्या त्यांच्या आगामी चित्रपट डफ वर काम करीत आहे. चित्रपटाची कथा विदर्भीय लोकांच्या जीवनावर आधारित आहे. सोबतच याचं वर्षी त्यांनी लिहलेला ‘ख़्वाबों के कमरे में’ हा हिन्दी-उर्दू भाषेचा काव्यसंग्रह प्रकाशित झालं आहे. हा काव्यसंग्रह अमेझॉन आणि फ्लिपकार्ट सारख्या ऑनलाईन प्लॅटफॉर्म वर उपलब्ध आहे. शहर व ग्रामीण भागातील मुलांना कलेचा इतिहास व मार्गदर्शन मिळण्यासाठी मी असे कार्यशाळा नेहमी घेत राहीन आणि कलेची सेवा करत राहीन. आमच्या न्यूज प्रतिनिधीशी बोलताना दिग्दर्शक अनिकेत परसावार यांनी सांगितले आहे.