मनसेच्या तक्रारी नंतर सार्वजनिक बांधकाम विभागाने केली रस्त्याची पाहणी

बोगस कामे करून शासनाच्या निधीत अपहार करणाऱ्या कंत्राटदाराला काळ्या यादीत टाका – राजु उंबरकर, मनसे


सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने काम करण्यात येत असलेल्या खैरी रस्त्याचे सिमेंट काँक्रिटचे काम निकृष्ट होत असल्याची तक्रार मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष शंकर वरघट यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे केली होती. सदर तक्रारीच्या अनुशंघाने काल ( ३१/५/२०२४ ) रोजी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पक्ष नेते राजु उंबरकर यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरले. काल या कामाचा सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता व संबधित अधिकारी यांच्या उपस्थितीत उंबरकर यांनी कामाची पाहणी केली तर कामात बऱ्याच त्रुट्या आढळून आल्या. त्यामुळे या संबधित कामाची सखोल चौकशी करून या कंत्राटदाराला काळ्या यादीत टाकण्याची आक्रमक मागणी राजू उंबरकर यांनी केली.

सार्वजनिक बांधकाम उपविभाग मारेगाव अंतर्गत येणाऱ्या राळेगाव तालुक्यातील खैरी येथे कोट्यवधी रुपये खर्च करून सिमेंट काँक्रिट रस्ता व नालीचे बांधकाम करण्यात येत आहे. परंतु या कामाचे कंत्राट मिळालेल्या कंत्राटदाराने अंदाज पत्रकातील सर्व नियमांना बगल देत आपलाच मनमर्जीने काम करीत असल्याने सदर काम अत्यंत निकृष्ट होत असुन, या कामाची पाहणी करून संबंधित कंत्राटदारावर काळया यादीत टाकण्याची कारवाई करण्याची मागणी मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष शंकर वरघट यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता यवतमाळ यांच्याकडे निवेदनाद्वारे केली होती . त्याच तक्रारीच्या अनुषंगाने मनसे नेते राजु उंबरकर यांनी आज शुक्रवार(३१मे) रोजी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना सोबत घेवुन या कामाची पाहणी केली असता त्या ठिकाणी अत्यंत दर्जाहीन काम दिसुन आल्याने संतप्त झालेल्या उंबरकर यांनी रस्ता फोडून दाखविण्याची मागणी केली असता. मजुरांनी रस्ता फोडल्यानंतर त्याठिकाणी अंदाज पत्रकाप्रमाणे कोणतेही साहित्य वापरण्यात आले नसल्याचे दिसुन आल्याने उंबरकर यांनी अधिकाऱ्यांना या कामाची गुण नियंत्रक पथकामार्फत तपासणी करण्याची मागणी करून निविदेत दिल्या प्रमाणे सर्व काम करण्यात यावे. याचबरोबर याठिकाणी करारात नमूद केलेल्या RMC प्लांट कंत्राटदाराकडे नसल्याने यात वापरण्यात येणारे साहित्य कुठे तयार करण्यात येत आहे. याची माहिती सुद्धा देण्यात आली नाही. त्यामुळे हे सर्व साहित्य बोगस असल्याचा आरोप मनसेकडून करण्यात आला आहे. तसेच कामामध्ये राहिलेल्या त्रुटी भरण्यात याव्या अन्यथा सदर कामाचे देयक अदा करू नये अशी मागणी सुद्धा यावेळी करण्यात आली आहे.
यावेळी मनसे जिल्हा उपाध्यक्ष शंकर वरघट, वणी तालुकाध्यक्ष फाल्गुन गोहोकार, दिपक वरटकर, संदीप कुटे, दिलीप कुटे, भारत निभूळकर, प्रवीण वानखडे, कार्तिक भारशकर कपिल मेश्राम, रोहित ससाणे,विवेक ढवस, चंद्रशेखर कवडे, आकाश क्षीरसागर, अक्षय काकडे, यांच्या सह गावकरी उपस्थित होते

चौकट

कामाचा बेसुमार दर्जा असल्याने देयक अदा करण्यात येवू नये.
सार्वजनिक बांधकाम विभाग मारेगाव अंतर्गत येणाऱ्या खैरी येथे चालु असलेले सिमेंट काँक्रिट रस्ता व नालीचे बांधकाम अंदाज पत्रकाप्रमाणे केल्या जात नसुन निविदेत असलेल्या सर्व अटी व शर्ती पायदळी तुडवून कंत्राटदाराने करारनाम्याचा भंग केला असल्याने बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना सर्व सुचना देवुन काळया यादीत टाकण्याची कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.


राजु उंबरकर(नेता,मनसे)

चौकट

त्रुटी युक्त काम असल्याने गुण नियंत्रक मार्फत चौकशी करण्यात येवुन पुढील कारवाई करू.
सदर कामा मध्ये अनेक त्रुटी आढळून आल्या असुन त्यामध्ये रस्त्याच्या उजव्या बाजूस जि.व्ही२मेटल लेझर मध्ये गिट्टी मध्ये राऊंड पेभेल आढळले नसल्याने कामाची जाडी कमी आहे तसेच निविदेतील आर एम सी प्लांट व संबंधित मशिन चेक करून त्याचे कागदपत्रे सदर करण्याचे आदेश दिले आहेत तसेच कंत्राटदाराने आरएमसी प्लांट अद्याप पर्यंत जाग्यावर उभारला नसल्याचे आढळून आले असून त्याच प्रमाणे अनेक त्रुटी या कामांत आढळुन आल्या असल्याने मनसे नेते राजु उंबरकर यांनी विनंती केल्या प्रमाणे कार्यकारी अभियंत्यांना गुण नियंत्रक व दक्षता पथाका मार्फत तपासणी करण्याचे पत्र देण्यात येवुन त्यांनतर पुढील कारवाई करण्यात येईल.


:- सुहास ओचावार
उपविभागीय अभियंता
सार्वजनिक बांधकाम उपविभाग
मारेगाव