
सहसंपादक : रामभाऊ भोयर
दारव्हा येथे शेकडो आदिवासी समाज एकत्र येऊन मोठ्या प्रमाणात आदिवासी जनसमुदाय एकत्र आला होता. बंजारा समाज आदिवासी एस टी प्रवर्गात आरक्षण मागण्या साठी सरकार वर दबाव आणून पाहतो आहे ही मागणी असंविधानीक आहे. सरकार ने २सप्टेबर २०२५ ला हैदराबाद गॅजेट्स लागु करण्यात आलेला जी आर हा असंविधानीक आहे परंतु या जी आर चा आधार घेत अशी मागणी करणे चुकीचे आहे. म्हणून दारव्हा येथे शेकडो आदिवासी एकत्र आल्या मुळे गजानन सभागृहात सभा आयोजित करण्यात आली या सभेत मा. राजु चांदेकर जिल्हा अध्यक्ष आदिवासी आक्रोश मोर्चा कृती समिती यवतमाळ आणि मा मधुसूदन कोवे गुरुजी मार्गदर्शक, आरक्षण बचाव कृती समिती यवतमाळ यांच्या नेतृत्वाखाली आदिवासी समाजातील लोकांना मार्गदर्शन करण्यात आले होते. मा मधुसूदन कोवे , जिल्हा प्रवक्ते, यांनी दारव्हा येथे आदिवासी समाजातील लोकांना आव्हान केले की १० आक्टोंबर २०२५ ला जिल्हा कलेक्टर कार्यालयावर आरक्षण बचाव मोर्चा चे आयोजन आहे.आदिवासी समाजातील सर्व घटकांनी, शेतकरी, शेतमजूर, जेष्ठ नागरिक, महिला, नारीशक्ती, तरुण युवा बेरोजगार या मोर्चात सहभागी होणार आहेत म्हणून आपण सर्व सहभागी व्हावे. तसेच आपल्या समाजात कोणी घुसखोरी करण्याचे प्रयत्न करतं असेल तर ते कदापी शक्य होणार नाही. या आपण सहभागी व्हावे असे आवाहन मा मधुसूदन कोवे यांनी केले आहे. मा राजु चांदेकर जिल्हा अध्यक्ष यांनी सोशल मीडिया ला सांगितले की ही एकजुन फक्त झांकी आहे, आणि जिल्हा मोर्चा तर बाकी आहे सभागृहात पासून दोन किलोमीटर नारे निदर्शने, गावं गर्जना करत तहसील कार्यालय दारव्हा येथे तहसीलदार साहेब यांना शेकडो आदिवासी समाजाच्या वतीने निवेदन देण्यात आले. निवेदन देते वेळी मा राजु चांदेकर जिल्हा अध्यक्ष आरक्षण बचाव कृती समिती यवतमाळ मा मधुसूदन कोवे जिल्हा प्रवक्ते, मा विलास कनाके जिल्हा प्रतिनिधी मा तालुका स्तरावर असलेले प्रतिनिधी तालुका कृती समिती चे पदाधिकारी सदस्य मा राजु केराम नागभिडकर साहेब, गेडाम प्रणय लावरे, चेतन लोखंडे, युग गार पगारी, हरीष ढगे, गोविंद पत्रे आणि आणि सर्व समाज बांधव सहभागी झाले होते*
