न्यू इंग्लिश हायस्कूल राळेगाव येथे रमण विज्ञान केंद्र भ्रमणशील प्रयोगशाळेची भेट

    

न्यू इंग्लिश हायस्कूल, येथे रमण विज्ञान केंद्र, नागपूर यांच्या भ्रमणशील प्रयोगशाळेची दिनांक 28 जुलै ते 30 जुलै पर्यंत भ्रमणशील प्रयोगशाळेच्या गाडीची शाळेला भेट देण्यात आली यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांना विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील अनेक नवनवीन प्रयोगांचे ज्ञान या फिरत्या विज्ञान प्रयोग शाळेच्या गाडी मुळे प्राप्त झाले.. प्रयोगशाळेच्या या विज्ञान प्रदर्शनामुळे शाळेतील सर्व विज्ञान शिक्षकानी विद्यार्थ्यांना विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील वेगळ्या प्रयोगाबाबत यावेळी माहिती देण्यात आली. राळेगाव सारख्या आदिवासी तालुक्यातील विद्यार्थ्यांना या भ्रमणशील प्रयोगशाळेमुळे विद्यार्थ्यांना ज्ञान मिळाले आहे.. भ्रमणशील प्रयोग शाळेच्या यशस्वी करता शाळेतील सर्व विज्ञान शिक्षक तथा सर्व कर्मचारी वृंदांनी सहकार्य केले.