
राळेगाव तालुका प्रतिनिधी रामभाऊ भोयर
राळेगाव येथे आदिवासी आरक्षण कृती संघर्ष समितीच्या वतीने आज दि 27 ऑक्टोबर 2023 रोजी आदिवासी आक्रोश मोर्चा काढण्यात आला होता, मोर्चा सुरवात कोल्हे सभागृह येथे मान्यवरांच्या हस्ते क्रांती सुर्य भगवान बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेचे पूजन करून मोर्चाची सुरुवात झाली राळेगाव शहरातील प्रमुख मार्गावरून जाताना भगवान बिरसा मुंडा भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर , अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले क्रांती चौक मार्गाने रावेरी पॉईंट येथुन उपविभागीय कार्यालयावर धडक देऊन सभेमध्ये रुपांतर करून किरण कुमरे, गित घोष, पुष्पाताई आत्राम महेश कोडापे, रेखाताई कुमरे, संदीप पेदोर, यांनी समाजबांधवाला मार्गदर्शन केले नंतर शिष्टमंडळाने उपविभागीय अधिकारी राळेगाव यांना निवेदन देण्यात आले प्रमुख मागण्या, धनगर समाजाला आदिवासी मध्ये आरक्षण देऊ नये , अनुसूचित जमाती विभागातील रिक्त पदे भरणे पेसा क्षेत्रातील सरळ सेवा भरती करणे, आदिवासी समाजाच्या वर्ग दोनच्या जमीन वर्ग एक मध्ये करणे इतर मागण्या करण्यात आल्या नंतर मोर्चा विश्रामगृह जवळ असलेल्या वीर बापुराव शेडमाके, यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले , मान्यवरांनी मनोगत व्यक्त करून मोर्चाची सांगता करण्यात आली यावेळी, किरण कुमरे महासचिव बिरसा क्रांती दल महाराष्ट्र, सरचिटणीस काँग्रेस कमिटी यवतमाळ,संदीप पेंदोर सामाजिक कार्यकर्ते,नरेश गेडाम जिल्हाध्यक्ष आदिवासी विकास परीषद यवतमाळ, गित घोष, सामाजिक कार्यकर्ते, गेडाम साहेब, सेवानिवृत्त तहसीलदार, प्रदीप ऊईके , दिलीप कनाके, शंकर पंधरे तालुकाध्यक्ष ट्रायबल फोरम राळेगाव, नानाजी कोवे, दिलीप हिवरकर, विक्रम पेंदोर, कोडापे साहेब, सुनिताताई , कुमुदताई मेश्राम, सुरेश पेंदोर, पुंडलिक येडसकर, विनोद मडावी, दिनेश करपते तालुकाध्यक्ष बिरसा ब्रिगेड , रेखाताई कुमरे, चांदेकर ताई, ऊईके सर, निरंजन कोवे, सदानंद टेकाम, संजय कनाके, विजय पेंदोर, सुनील मेश्राम, विनोद सिडाम, प्रविण कुळसंगे, गजानन सिडाम , अरविंद कोडापे,अजय जुमनाके,तसेच तालुक्यातील मोठ्या संख्येने आदिवासी बांधव उपस्थित होते व पोलिस निरीक्षक रामकृष्ण जाधव पोलिस उपनिरीक्षक मोहन पाटील व सर्व त्यांची सर्व टिम बंदोबस्तात उपस्थित होते
