
सहसंपादक : रामभाऊ भोयर
वर्धा नदीपात्रातून अवैधरित्या वाळू उपसा करून वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरवर पोलिसांनी धडक कारवाई करीत ट्रॅक्टर ताब्यात घेतला.ही कारवाई वडकी पोलिसांनी दि ११ फेब्रुवारी रोजी रात्री १ च्या दरम्यान तालुक्यातील वाढोना बाजार येथे केली
पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार दि ११ फेब्रुवारी रोजी रात्री ठाणेदार सुखदेव भोरकडे हे गस्तीवर असताना त्यावेळी वाढोना बाजार येथे (एमएच २९ सीबी ४७०४) या क्रमांकाचे ट्रॅक्टर वाळू
वाहतूक करताना आढळून आले. चालकाला वाळू वाहतुकीबाबत परवाना विचारला असता त्यांच्याकडे वाळू वाहतूकीचा कोणताही परवाना नव्हता. दरम्यान पोलिसांनी ट्रॅक्टर जप्त केले आहे.या प्रकरणी सचिन नेवारे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून
नितीन नरेश पोहनकर (३२) रा.वाढोना बाजार याचे विरोधात वडकी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून या कारवाईत पोलिसांनी दीड ब्रॉस रेती किं.६ हजार रु व ट्रॅक्टर किं ८ लाख रु,असा एकूण ८ लाख ६ हजाराचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.
सदरची ही करवाई ठाणेदार सुखदेव भोरकडे सह चालक अमीर कींनाके यांनी केली आहे
