
यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी रामभाऊ भोयर
राळेगाव तालुक्यातील धानोरा येथील घरकुल लाभार्थ्यांचे गटविकास अधिकारी केशव पवार यांना दि.१ एप्रिल २०२६ रोजी निवेदन देण्यात आले.
शासनाचे मोदी आवास योजने अंतर्गत घरकूल मंजूर झाले आहे,मंजूर झालेल्या घरकूलाचे बांधकामा करीता रेतीची आवश्यकता आहे,रेती उपलब्ध न झाल्यामुळे घरकुलाचे काम रखडले आहे.आपले कार्यालयामार्फत सचिव धानोरा यांना केवळ पि.एम. घरकूल योजनेच्या लाभाऱ्यांना रेती उपलब्ध करून देण्याबाबत लाभार्थ्यांची यादी व सुचना पत्राचा पि.डी.एफ सचिव यांना पाठविला असून त्यात मोदी आवास योजनेच्या लाभार्थ्याचे नावे समाविष्ठ नाही त्यामुळे आम्ही घरकुल लाभार्थी घरकुल लाभापासून वंचित आहोत,तरी लाभार्थ्यांना रेती उपलब्ध करून देण्यात यावी व रोहिणी किव्हा हिवरा घाटातून उपलब्द करून देण्यात यावी असे निवेदन विशाल येणोरकर (उपसरपंच),स्वप्नील गलाट,गणेश फुलबांधे,विलास साखरकर (पत्रकार),दिनेश साखरकर,विजय चकोले,अविनाश घोडे,निलेश वरघणे,हर्षल घोडे उपस्थित होते.यावेळी घरकुल लाभार्थी शोभाबाई साखरकर,गंगाबाई फुलबांधे,रूपेश चौधरी,प्रितम घिनमिने,जितेंद्र घिनमिने,परसराम रेवतकर,गजानन चौधरी,किशोर फटिंग,रविंद्र घिनमिने,सुधाकर घिनमिने,प्रविण थुल उपस्थित होते.
