
प्रतिनिधी::प्रवीण जोशी
ढाणकी शहरात गेल्या काही वर्षात मोठ्या प्रमाणात पतसंस्थांचे जाळे विणल्या गेले इतर रिझर्व बँकेच्या नियंत्रणात असलेल्या ठिकाणी व्याजदर कमी असल्यामुळे ग्राहक आकर्षित होऊन जिथ व्याजदर जास्त आहे अशा ठिकाणी रक्कम गुंतवणूक करणे साहजिक आहे पण हाच प्रकार ग्राहकाच्या फसवणुकीपर्यंत येऊन ठेपला आहे शहरातील राजस्थानी मल्टीस्टेट क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटीचे उद्घाटन होऊन काही महिने झाले व हे व्यवहार काही दिवस सुरळीत चालले पण नंतर येथील व्यवहार मात्र ठप्प झाले असून ग्राहक मात्र हतबल झालेला दिसतो आहे. याला अनुसरून शाखा ढाणकी येथील ग्राहक ठेवीदार बचत खाते व दैनंदिन वसूल करता प्रतिनिधी यांनी याला अनुसरून निवेदन दिले या निवेदनात प्रामुख्याने मल्टीस्टेट सोसायटी मधील दैनिक ठेव परतावा व इतर व्यवहाराला असलेली रक्कम किती कालावधीमध्ये परत देणार अशी विचारणा केली यावेळी शाखा अधिकारी पदावर कार्यरत असलेल्या शाखाप्रमुखांनी हे निवेदन स्वीकारले शाखाप्रमुखानी आणि यावेळेस अध्यक्ष उपाध्यक्ष व सचिव कार्यकारी संचालक व मुख्याधिकारी यांना निवेदनाला अनुसर ग्राहकांची रक्कम तत्काळ अदा करण्याची विनंती करू असे सांगितले.मात्र तारखेवर तारखाच ग्राहकाला दिल्या जात आहे यापुढे घोड सरकायला तयार नाही.
शहरातील एकही राजकीय पक्ष मात्र ग्राहकांच्या मागे ठामपणे उभे राहताना दिसला नाही. निवेदन अर्ज देऊनही कोणत्याही प्रकारची कार्यवाही होत नसून काही दिवसानंतर आपसूकच सर्वसामान्यांना विसर पडतो व ही यंत्रणा काहीही होत नाही अशा अविर्भावात वावरते त्यामुळे काही प्रमाणात जनता सुद्धा यायला तेवढीच जबाबदार आहे जे मल्टीस्टेट वाले एवढा व्याजदर आहे किंवा देतात तो कोण्या अनुषंगाने कसे काय देऊ शकतात अशा कोणत्याही बाबीचा विचार न करता आपली माणसे आहेत कुठे जाणार आहेत असा विश्वास टाकून मोकळे होतात. त्यामुळे अशी फसगत होण्याची शक्यता असते तर दुसऱ्या ठिकाणी एका सायकल टॅक्सीवाल्याचे दैनंदिन खाते आर डी एजंट कडे होते पण त्याने रक्कम घेऊन पोबारा केला “ना कोई गवा ह ना कोई सबूत” अशीच गत त्या ठिकाणी सुद्धा दिसून येत आहे हातावर आणायचे व पानावर खायचे अशा कष्टकरी लोकांच्या पैशाचा अपहार एजंट करत असल्यामुळे लोकांनी आता आपला माणूस आहे करून खातो आहे या बाबीचा विचार करणे सोडून प्रथम स्वतःच्या रकमेचा विचार करणे कर्म प्राप्त ठरत आहे तसेच इतर अनेक ठिकाणी शहरात अधिक व्याजदराचा गंडा घालणारी मंडळी अशी फसगत करून शकतात त्यामुळे यांच्यापासून सतर्क राहूनच व्यवहार करणे योग्य राहील असे काही ज्येष्ठ नागरिकांना वाटते
पतसंस्थेतील रकमेला कोणत्याही प्रकारचे संरक्षण नसते भले ही रिझर्व बँकेच्या नियंत्रणाखाली येत असलेल्या ठिकाणी व्याजदर जरा कमी असला तरी रुपये पाच लाखाचा विमा त्याठिकाणी रकमेला असतो काही कारणास्तव बँक अडचणीत जरी आली त्या ठिकाणी मदत होण्याची शक्यता असते. पण पतसंस्थेला मात्र अशा प्रकारचे कोणते ही संरक्षण नसते त्यामुळे ग्राहकच यात भरडल्या जातो. मार्च महिन्यात काही पतसंस्था आमच्याकडे मोठ्या प्रमाणात डिपॉझिट ग्राहकांनी दिले आहे असे सांगतात पण त्यांना शहरातून डिपॉझिट मिळाले नाही हे विशेष तर काही ठिकाणी त्यांच्या सुटा बुटातील चेलाचपट्यांनी आपली संपत्ती विकून स्वतःची कातडी वाचवण्यासाठी गुंतवणूक केल्याचे ही चर्चा आहे स्थानिकांना कर्ज देताना अडथळे आणत असल्याचे बोलल्या जात आहे आता एक नवीन फंडा या चेल्या चपाट्यानी अवलंबल्याचीही ऐकिवात आहे तो असा की कर्ज पतसंस्था वाले ज्याप्रमाणे जमानतदार उभे करतात व कोरे चेक घेतात तसेच ग्राहक सुद्धा सजग झाला असून पतसंस्थेत रक्कम गुंतवणूक करताना एखाद्या राजकीय नेत्याला समोर करत आहे असं ऐकिवात आहे तेव्हा ग्राहकांनी पतसंस्थेच्या चेल्या चपाट्या सोबत सांभाळून व्यवहार करणे जिकरीचे बनले आहे आणखीन एक आर डी एजंट व एक पतसंस्था पोबारा करण्याच्या चर्चा शमण्याचे चिन्ह दिसत नाही
