देशाला उध्वस्त करणारे कायदे मोदी सरकार आणत आहेत: विजय वडेट्टीवार विरोधी पक्षनेता विधानसभा महाराष्ट्र राज्य

सहसंपादक : रामभाऊ भोयर

सद्यस्थितीत मोदी सरकार वन नेशन वन इलेक्शन सारखे कायदे करू पाहत आहेत या कायद्यामुळे देशाचे कुठले भले होणार नसून केवळ आपल्या पक्षाचा भले मोदी करणारआहेत असे कायदे करून देशाला उध्वस्त करण्याचे छडयंत्र मोदी सरकार करीत आहेत असे प्रतिपादन राज्याचे विधानसभा विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी जनसंवाद यात्रे दरम्यान राळेगाव येथे केले जनसंवाद यात्रा ही तालुक्यातून वडकी येथून सुरू झाली ठीक ठिकाणी यात्रेचे काँग्रेस कार्यकर्त्यांनी स्वागत केले राळेगाव येथे शहरातून पदयात्रा काढून बिरसा मुंडा पुतळ्याजवळ वडेट्टीवार यांनी जनतेला संबोधित केले यावेळी राज्याचे माजी शिक्षण मंत्री प्रा वसंत पुरके जिल्हाध्यक्ष ऍड प्रफुल्ल मानकर काँग्रेस ओबीसी विभागाचे जिल्हाध्यक्ष अरविद वाढोनकर जावेद अन्सारी संजय राठोड तालुकाध्यक्ष राजेंद्र तेलंगे शहराध्यक्ष प्रदीप ठुणे वसंत जिनिंगचे सभापती नंदकुमार गांधी खरेदी विक्री संघाचे सभापती मिलिंद इंगोले काँग्रेस उद्योग विभागाचे जिल्हाध्यक्ष शशांक केंढे नगराध्यक्ष रवींद्र शेराम उपाध्यक्ष जानराव गिरी आदि उपस्थित होते उपस्थितना मार्गदर्शन करताना वडेट्टीवार पुढे म्हणाले राहुल गांधी यांनी जनसंवाद यात्रेच्या माध्यमातून दुभंगलेली मने जोडण्याचे काम केले आहेत काँग्रेस सुद्धा राज्यांमध्ये यात्रेच्या माध्यमातून लोकांना एकत्र करण्याचे काम करत आहेत एकीकडे शासन शेतीमालाला दुप्पट भाव देऊ असे म्हणते व दुसरीकडे खतावरील सबसिडी कमी करण्याचे उद्योग करत आहेत सिलेंडरचे भाव चारशे रुपये वरून तेराशे रुपयावर नेले व दोनशे रुपये कमी केले हा ढोंगीपणा जनतेच्या लक्षात आला आहे एकीकडे देशाच्या राष्ट्रपती पदी आदिवासी महिलेला बसवायचे व मणिपूरमध्ये आदिवासी वरती अत्याचार सुरू असताना त्याकडे दुर्लक्ष करायचे हा दुटप्पीपणा मोदी सरकार करत आहेत राज्यात सुद्धा अशीच स्थिती आहेत एक अलीबाबा व 80 चोर सध्या राज्यात राज्य करीत आहेत मराठा तरूनांवरती लाठीचार्ज होतो शेतकरी दुष्काळाच्या छायेत आहेत धान उत्पादक व कांदा उत्पादक शेतकरी अडचनित आहेत अशा शेतकऱ्यांना कुठलीही मदत शासन करताना दिसत नाही देशात तसेच राज्यात बदलाचे वारे वाहत आहेत या बदलाची नांदी ही जनसंवाद यात्रा ठरत आहे याला जनतेने मोठ्या प्रमाणात सहकार्य करावे असे आवाहनही यावेळी वडेट्टीवार यांनी केले शहरात वडेट्टीवार यांनी इंदिरा गांधी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व क्रांतिवीर बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेला अभिवादन केले यात्रेचा समारोप बाजार समितीमध्ये झाला यावेळी काँग्रेसचे कार्यकर्ते पदाधिकारी विविध संस्थांचे संचालक अध्यक्ष उपाध्यक्ष व शहरातील जनता मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.