विज चमकली अन् ६ बकऱ्यावर एकाच वेळेस मरण कोसळलं,शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी

राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर(9529256225)

मारेगाव तालुक्यातील वरूड येथील एक अत्यंत ह्रदयद्रावक प्रसंग घडला आहे वरूड गावा शेजारी असलेल्या टेकडी परिसरातील कवडु नागोशे यांच्या शेता शेजारी बकऱ्या चरत असताना अचानक पाऊस सुरू झाला व विजेचा कडकडाट सुरू होताच वरुन येथील वीज पडून तब्बल ६ बकऱ्याचा मृत्यू झाल्याची ह्रदयद्रावक घटना आज दि. २९आँगस्ट रोज रविवारला ४.३० दरम्यान घटना घडली आहे यामध्ये ३बकऱ्या जिजाराम नागो नागोशे , माधव साधु घोसले ३ नग बकऱ्यवर विज पडुन मरण पावल्या असल्याने ७०ते ८०हजार रूपयाचे नुकसान झाले असुन. नुकसान झालेल्या पशुधन मालकाला शासनाने आर्थिक मदत देण्याची मागणी नागरिकांकडून होत जात आहे.