आरोग्य केंद्र ढाणकी मध्ये रेबीज आणि टी टी इंजेक्शन ची कमतरता, लोकहित महाराष्ट्र च्या पत्रकाराने मांडली जनतेची व्यथा, सत्य परिस्थिती दाखवत आमदार साहेबांना निवेदन


लोकहीत महाराष्ट्र उमरखेड
तालुका प्रतिनिधी. संदीप बी. जाधव


लोकहीत महाराष्ट्र प्रतिनिधी संदीप जाधव यांनी आमदार नामदेवजी ससाने साहेबांच्या निवासस्थानी उमरखेड येथे जाऊन साहेबांची भेट घेतली, व साहेबांना आरोग्य केंद्र ढाणकी विषयी परिपूर्ण माहिती दिली, साहेब जवळपास ढाणकीशहराच्या अवतीभवती शेतकरी आणि मजूर वर्ग वसलेला आहे, शेतकरी म्हटले की त्यांच्याजवळ कुत्रा असतोच, तेव्हा त्या कुत्र्याने चावल्यावर कमी खर्च लागावा म्हणून सरकारी आरोग्य केंद्रामध्ये कुत्रा चावलेला व्यक्ती गेले असता, त्यांना रेबीज नावाची लस तिथे उपलब्ध मिळत नसल्यामुळे स्वखर्चाने बाहेरून मेडिकल वरून प्रति लस 400 रुपये दर भरून आणावे लागते. तो गबाळ कष्ट करणारा शेतकरी एक तर मालाला भाव नाही, गारपीट मध्ये झालेल्या नुकसानाची भरपाई पण मिळाली नाही, तेव्हा तो गरीब शेतकरी चारशे रुपयाची लस बाहेरून कशी आणणार व टीटीची पण लस उपलब्ध नाही, असं निवेदनांमध्ये पत्रकार संदीप बळीराम जाधव यांनी लिहून दिले असता, आमदार नामदेव ससाने साहेबांनी तात्काळ ढाणकी आरोग्य केंद्रामध्ये फोन करून विचारून माहिती पक्की करून जिल्हा रुग्णालय यवतमाळ मध्ये तात्काळ फोन करून रेबीज नावाची लस व टी टी चे इंजेक्शन ढाणकी आरोग्य केंद्रामध्ये100 रेबीज वॅक्सिंन तात्काळ पोचवावे असं भ्रमणध्वनी मार्फत कळविले. त्यासोबत विडूळ, उमरखेड, मुळावा या गावांमध्ये त्वरित रेबीज व टीटीचे इंजेक्शन उपलब्ध करून द्यावेत असा संवाद साधला, लोहीगीत महाराष्ट्र प्रतिनिधी यांना शब्दाच्या सुमनाने सन्मानित केले.