
‘
सहसंपादक : रामभाऊ भोयर
राळेगाव येथील न्यू इंग्लिश हायस्कूल येथे दिनांक 6 व 7 नोव्हेंबर रोजी
पोलाद स्टील जालना आणि श्रीहरि ओम ट्रस्ट आर्णी यांच्या संयुक्त विद्यमाने न्यू इंग्लिश हायस्कूलच्या सर्वच विद्यार्थ्यांना आकाश गंगेतील सूर्यमालेचे थ्रीडी दर्शन घडवण्याचा आगळावेगळा आणि माहितीपूर्ण
उपक्रम राबवण्यात आला.
पोलाद स्टील कंपनीने एक मिनी तारांगणच शाळेच्या हॉलमध्ये उभे केले आणि वर्ग 5 ते 10 पर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यां सोबतच शिक्षकांना सुद्धा आपल्या आकाशगंगेची आणि सौर-मालेची सहलच घडवून, भारताच्या चंद्रयान यांची सविस्तर माहिती देण्यात आली तसेच यामध्ये आपली सूर्यमाला, सूर्यमालेतील सर्व ग्रह,उपग्रह आणि धुमकेतू याची सखोल माहिती त्यामध्ये देण्यात आली. अर्थातच ही माहिती मुलांसाठी फार महत्त्वाची असल्याने आणि मंत्रमुग्ध करणारी असल्या कारणाने, सर्व मुलांनी ही प्रतिसौरमाला पाहण्याचा आनंद घेतला अवकाशातील खगोलीय घटना प्रत्यक्ष डोळ्यासमोर घडताना पाहून मुलांनाही खूप आनंद झाला.
पोलाद स्टील कंपनी जालना आणि ही मिनी सौरमाला तारांगण दाखवणारे ऑपरेटर योगेश चौधरी, मनोज सपकाळ, एरिया मॅनेजर महेश सर, विदर्भ मॅनेजर देविदास अढाव यांचे सोबतच शाळेचे संचालक प्रमोद बुब, शाळेचे मुख्याध्यापक विजय कचरे, उपमुख्याध्यापक सुरेश कोवे, पर्यवेक्षक सूचित बेहरे तसेच शाळेतील सर्व शिक्षकांनी या उपक्रमाचे कौतुक केले.
