
वणी ते पुरड या रस्त्याचे बांधकाम नुकतेच पूर्ण झाले असून काही दिवसांतच संपूर्ण रस्त्याची वाट लागून गेली आहे त्यामुळे या रस्त्यावरून नियमित वाहतूक करणाऱ्या वाहनचालक नागरिकांमध्ये या रस्त्याच्या बांधकामात बाबत मोठ्या प्रमाणात भ्रष्ट्राचार झाला असल्याने लवकरच रस्ता उखडला अशी चर्चा ऐकिवात येत आहे . प्रत्यक्षात वणी ते पुरड रस्त्याच्या डांबरीकरनासाठी 5875.00लक्ष खर्च करण्यात आले आहे परंतु बांधकाम केलेल्या रस्त्यावर मोठ मोठे खड्डे पडल्याने संपूर्ण रस्त्याची प्रचंड दुर्दशा झाली असून रस्त्यावरील डांबरीकरण पूर्णपणे उखडून रस्त्यावर पसरट खोल दोन दोन चार चार फुटांचे खड्डे पडल्यामुळे ये जा करणार्यांना मोठी कसरत करावी लागत आहे. त्यामुळे वणी कायर पुरड ,मानकी, या रस्त्यावरून मोठ्या प्रमाणात ओव्हरलोड वाहतूक असून हा मार्ग आंध्रप्रदेश राज्यात जाण्यासाठी जवळचा आहे. या मार्गावर अनेकदा रस्त्याचे बांधकाम करण्यात आले असून आताच रस्त्याचे बांधकामासाठी दिलेला निधी खर्चून बांधकाम पूर्ण केले परंतु जडवाहतुकीमुळे रस्त्यावर खड्डे पडून रस्ता वाहतुकीस अयोग्य झाला आहे त्यामुळे रोज या रस्त्यावर 14 व्हीलर ट्रक चा अपघात होऊन कडेला पडलेले दिसून येत आहे . कारण नुकतेच बांधकाम पूर्ण झाल्याचे बोर्ड लागले आहे. वणी तालुक्यात कोळसा खाणी, चुनखडी, ‘डोलामाईट , सिमेंट आता मोठी रिलायन्स कंपनीचे बांधकाम सुरू असल्याने मोठ्या प्रमाणात जडवाहतुक होत आहे. त्या जडवाहतुकीच्या टनानुसार रस्त्याचे बांधकाम असायला पाहिजे असे नागरिकांतून बोलल्या जात आहे त्यामुळे रस्त्याची वाट लागली आहे. तसेच या रस्त्यावर बरेच पूल बांधण्यात आले आहे .परंतु या रस्त्यावरून दररोज 500 ते 700 ट्रॅक, बसगाड्या, अठरा व्हीलर, चौदा व्हीलर, ऑटो, ट्रॅक्स, कालिपिवली, तसेच क्षमतेपेक्षा जास्त भरलेली ओव्हरलोड वाहतूक केली जाते. त्यामुळे या वाहतुकीमुळे रस्ता उखडला जात आहे. अपघाताचे प्रमाण जास्त आहे. या रस्त्यावर अनेकदा डागडुजी करून लाखो रुपये खर्च केले आहे. या रस्त्याचे बांधकाम निकृष्ठ झाले आहे. त्यामुळे रस्ता ठिकठिकाणी उखडला जात आहे . तेव्हा शासनाने त्वरित लक्ष घालून रस्त्याची दुरुस्ती करावी अशी मागणी त्रस्त नागरिकांनी केली आहे.
