राळेगाव नगरपंचायत च्या वतीने रस्ता व नाली बांधकामाचे उद्घाटन

सहसंपादक -रामभाऊ भोयर

नगर पंचायत राळेगावच्या वतिने राळेगाव शहरातील विविध प्रभाग क्र. ५ ,६ ,१३ ,१६ येथील रस्ता व नाली बांधकाम भूमिपूजन सोहळा संपन्न झाला.
मा. अॅड. प्रफुल्लभाऊ मानकर, जिल्हाध्यक्ष यवतमाळ जिल्हा काँग्रेस कमेटी यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले.
यावेळी अरविंदराव वाढोणकर ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष, रविंद्र शेराम, नगराध्यक्ष, जानराव गिरी उपाध्यक्ष, मंगेश राऊत बांधकाम सभापती, कुंदनराव कांबळे गटनेते, कमलेश गहलोत आरोग्य व शिक्षण सभापती,दिलीप दुधगिकर नगरसेवक, शशिकांत धुमाळ, नगरसेवक, नंदकुमार गांधी, नगरसेवक, मधुकरराव राजुरकर, नगरसेवक, प्रदिप ठुणे, शहर अध्यक्ष काँग्रेस कमेटी, हमिदभाई पठान,गजाननराव पुरोहित, कुणाल भोयर,राजु दुधपोळे,राजु दिघडे, प्रदिप लोहकरे, प्रतिक बोबडे, गणेश कुडमेथे, बि. यु. राऊत, गोवर्धन वाघमारे, गजानन होले, राहुल होले, विनय मुनोत, महेंद्र फुलमाळी, अशोकराव भागवत, पत्रकार काका, गुलाबराव बावणे, राष्टपाल भोंगाडे, झामरे, ताकसांडे, दत्ता चांदोरे, नगर पंचायतीचे अभियंता अशोक देशमुख व जीवन जळीतकर न. पं. इत्यादीच्या उपस्थिती संपन्र झाला.