
यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी रामभाऊ भोयर
बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी पुन्हा एकदा धाडस दाखवत गोवंश तस्करीचा मोठा प्रकार उघडकीस आणला आहे. काल रात्री सुमारे 11:30 वाजताच्या दरम्यान, हिंगणघाटहून राळेगाव मार्गे गोवंशाने भरलेला ट्रक येत असल्याची गुप्त माहिती राळेगाव बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांना मिळाली.
माहिती मिळताच कार्यकर्त्यांनी तात्काळ वर्धा बायपास परिसरात सापळा रचून वाहन थांबवण्याचा प्रयत्न केला, मात्र चालकाने वाहन न थांबवता वेगाने पुढे काढले. यानंतर बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून त्या वाहनाचा पाठलाग सुरू केला.दरम्यान, सदर ट्रक घाटंजी रोडने जात असल्याचे लक्षात येताच जगदीश भाऊ निकोडे यांनी घाटंजी येथील बजरंग दल कार्यकर्त्यांना तत्काळ सतर्क केले. सर्वांच्या समन्वयातून अखेर रात्री सुमारे 1:30 वाजता पिंपरी बुट्टी येथे ट्रक पकडण्यात यश आले.
धक्कादायक वास्तव समोर
ट्रकची तपासणी करताना अत्यंत धक्कादायक बाब समोर आली. वाहनामध्ये एकूण 20 जनावरे भरलेली होती, त्यापैकी 3 जनावरे मृत अवस्थेत आढळली, तर अनेक जनावरे गंभीर जखमी होती.
घटनेनंतर वाहन चालक (वाहन क्रमांक MH-40 N-7592) हा ट्रक सोडून घटनास्थळावरून फरार झाला. या प्रकरणी संबंधित वाहनावर कारवाई करण्यात आली आहे.
कारवाईत सहभागी प्रमुख कार्यकर्ते
या धाडसी कारवाईत बजरंग दलाचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी होते, त्यामध्ये –सागर भाऊ मिलमिले (जिल्हा सह संयोजक, यवतमाळ)
राहुल भाऊ गायकवाड (प्रखंड संयोजक, घाटंजी)
जगदीश भाऊ निकोडे (प्रखंड संयोजक, राळेगाव)
युवराज देवकर (गौरक्षा प्रमुख)
अजय धतकर, राजकुमार बघेल, दीपक बघेल
अनुराग देवकर, सचिन भूत, विशाल ठाकरे, संदेश गिरी
आणि इतर अनेक कार्यकर्त्यांचा समावेश होता.
धाडसाचे सर्वत्र कौतुक
राळेगाव बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी जीवाची पर्वा न करता केलेल्या या धाडसी कारवाईचे सर्वत्र कौतुक होत आहे. त्यांच्या सतर्कतेमुळे मोठ्या प्रमाणावर गोवंश तस्करीचा प्रकार उघडकीस आला आहे.
