
यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी रामभाऊ भोयर
राळेगाव तालुक्यातील झाडगाव येथे १० ते १९ वर्षे हा किशोरवयीन मुलींचा विकासाचा टप्पा असून, या काळात शारीरिक, मानसिक आणि संप्रेरकीय बदल वेगाने होतात यात मासिक पाळी सुरू होणे, उंची व वजन वाढणे, आणि शरीरात दुय्यम लैंगिक बदल दिसून येतात या काळात पोषक आहार, वैयक्तिक स्वच्छता, आणि भावनिक आधाराची गरज असते.शारीरिक बदल: साधारण ८ ते १३ वर्षांच्या वयात शारीरिक बदलांना सुरुवात होते, जसे की उंची वाढणे, मासिक पाळी सामान्यतः १० ते १५ वर्षांच्या दरम्यान पहिली मासिक पाळी येते सुरुवातीच्या १-२ वर्षांत ती अनियमित असू शकते
पोषण या काळात रक्ताची कमतरता टाळण्यासाठी लोहायुक्त.आहार, कॅल्शियम, प्रथिने आणि हिरव्या पालेभाज्यांचा आहारात समावेश करणे आवश्यक आहे.वैयक्तिक स्वच्छता मासिक पाळी दरम्यान सॅनिटरी पॅड्सचा वापर, नियमित अंघोळ आणि जननेंद्रियांची स्वच्छता राखणे संसर्ग टाळण्यासाठी महत्त्वाचे आहे.मानसिक व भावनिक बदल हार्मोनल बदलांमुळे स्वभावात चिडचिड, आत्मविश्वास कमी होणे, किंवा सोशल मीडियामुळे शरीराच्या प्रतिमेबद्दल चिंता वाटू शकते आरोग्य समस्या: थकवा, अशक्तपणा, चेहऱ्यावर मुरुमे आणि अनियमित पाळी या सामान्य समस्या आहेत.यासोबत वाढती गुन्हेगारी मुलींना मुलांचे वाढणारे आकर्षण इत्यादी महत्व पूर्ण विषयला धरून आज राळेगाव पोलीस स्टेशनं चे योगेश धंदे सहाय्यक पोलीस निरीक्षक, तसेंच पूजा वंजारी, नर्स झाडगाव, प्रशांत वाणी पोलीस पाटील,रुपेश जाधव पोलीस, रुपेश रेंघे,क्षीरसागर मॅडम, इत्यादी मान्यवर मंडळीने वरील विषयावर मार्गदर्शन केले यावेळी शीतल चांदेकर, सेविका, संगीता पाल, वैशाली चांदेकर,माधुरी राजूरकर वैशाली ढाले, कविता पारिसे, व सर्व किशोर वयीन मुली उपस्थित होत्या.
