
राळेगाव तालुका प्रतिनिधी:- रामभाऊ भोयर
राळेगाव तालुक्यातील वडकी येथे सेंट्रल बँक समोर वडकी येथील गंगा रामदास कुमरे (४५) या महीलेला सि.एम.ई.जि. पी. ( मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम) या योजने अंतर्गत जिल्हा उद्योग केंद्रा व्दारे जिल्हाधिकारी यांचेकडुन मंजुर करुन सेंट्रल बँक शाखा वडकी ला कर्ज देण्यास मंजुरी दिली. परंतु शाखा व्यवस्थापक यांनी आम्हाला कुठलेही याबाबबत पत्र आलेले नाही असे सांगितले. त्यामुळे यवतमाळला तक्रार निवारण सभेत कर्ज देण्याचा आदेश करुन सुद्धा मला जातीय द्वेषापोटी आज पर्यंत कर्ज दिलेले नाही. यामुळे बँक व्यवस्थापक वडकी यांचेकडून शासनाच्या महिला सक्षमीकरण धोरणाला हरताळ फासला जात असून यामुळे उपोषण कर्त्या महिलेस मानसिक व आर्थिक त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे दि. १२ डिसेंबर पासुन वडकी सेंट्रल बँकेसमोर आमरण उपोषण सुरु केले असून मला मंजूर झालेले कर्ज त्वरित देण्यात यावे व सेंट्रल बँक वडकीचे व्यवस्थापक चंद्रशेखर कोरेकार यांचेवर आदिवासी महिलेस तिचे हक्कापासून वंचीत ठेवून मला आर्थिक व मानसिक त्रास देणे या कारणावरुन फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा. ही मागणी घेऊन वडकी येथील गंगा रामदास कुमरे यांनी सेंट्रल बँकेसमोर आमरण उपोषण सुरु केले आहे. जर उपोषण दरम्यान मला अथवा माझ्या कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीस काही घडल्यास याला सेंट्रल बँकेचे व्यवस्थापक चंद्रशेखर कोरेकार हे व प्रशासन जबाबदार राहील असे उपोषण कर्त्या महिलेने लेखी निवेदनाद्वारे सांगितले आहे.
