
एपीएल शेतकरी गटामध्ये दोन गट आहेत. त्यामध्ये.१) प्राधान्य गट व २)सामान्य गट असे दोन भाग विभागले आहेत. १) प्राधान्य गटात उत्तम शेतकरी आहेत, २) सामान्य गटात अल्पभूधारक शेतकरी आहे. यात प्राधान्य गटाला स्वस्त धान्य मिळतो.
सर्वसामान्य गट व मजूर वर्ग यांना स्वस्त धान्याचा लाभ मिळत नाही. ग्रामीण भागातील अर्थव्यवस्था ही शेतीवर अवलंबून असते, दरवर्षी पेक्षा यावर्षी शेतीच्या कामांमध्ये अपेक्षित असा जोर नसल्याने, यावर्षी शेतमजूरदार वर्गाला हाताला काम नाही. त्यातच सर्वसामान्य कुटुंबाला मिळणारे स्वस्त धान्य एकच आधार पण तोही आता मिळेना.
यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड तालुक्यात काही भागात मागील चार महिन्यापासून स्वस्त धान्य दुकानात पुरेसा धान्य साठा उपलब्ध नसल्याचे कारण देत, धान्य वितरण बंद आहे. अशातच सर्वसामान्य शेतमजूरदार वर्ग मात्र चांगलाच आर्थिक अडचणीत सापडला आहे. अल्पभूधारक शेतकरी, मजूरदार शेतकऱ्यांना जीवन जगण्यासाठी स्वस्त धान्य दुकानाचा आधार असतो तोही चार महिन्यापासून बंद आहे.
मागील चार महिन्यापासून स्वस्त धान्य दुकानातील वाटप बंद आहे. कारण विचारले असता पुरेसा साठा उपलब्ध नसल्याचे बोलले जात आहे.
लाभार्थी
संदीप बळीराम जाधव, मेट
अल्पभूधारक शेतकरी गट एपीएल.
