
77-राळेगाव विधानसभा
वंचित बहुजन आघाडी पक्षाचे अधिकृत उमेदवार श्री किरण भाऊ कुमरे यांचे प्रचारार्थ बाभुळगाव, कळंब,राळेगाव, (मोहदा करंजी, खैरगाव ,उमरी जी. प. गण ) येथील सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या उपस्थित संवाद साधून आगामी विधानसभा निवडणुकी विषयी चर्चा केली.
गेल्या 15-20 वर्षात आजी व माजी आमदारांनी मतदारसंघाची बिकट परिस्थिती निर्माण करून ठेवली आहे. हे आरक्षण विरोधी सरकार आहे, इथल्या युवकांच्या हाताला काम नाही, शेतकऱ्यांच्या पिकाला भाव नाही, रस्त्यांची दुरावस्था असे कित्येक प्रश्न कार्यकर्त्यांनी बोलून दाखवले.
इथला शेतकरी काबाडकष्ट करून सोन्यासारखे पीक काढतो, पण सरकारच्या नाकर्तेपणामुळे भाव मिळत नाही. यात बदल घडवायचा असेल तर सरकार व लोकप्रतिनिधी बदलणं गरजेचं आहे, येणाऱ्या काळात आपल्या विकासासाठी बदल घडवणं गरजेचं आहे.
आता ना…आजी..! ना… माजी..! यंदा किरण भाऊच मारणार बाजी…!
