नियमांचे पालन करूनच व्यवसाय करा
सहआयुक्त मिलिंद काळेश्वरकर

सहसंपादक: रामभाऊ भोयर

राळेगांव येथे तालुका केमिष्ट अँड ड्रगिष्ट असोसिएशन औषधी विक्रेता संघटनेच्या वतीने दिं ३० डिसेंबर २०२३ रोज शनिवारला मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
या मार्गदर्शन शिबिराच्या अध्यक्षस्थानी यवतमाळ येथील अन्न औषधी प्रशासन चे सहआयुक्त मिलिंद काळेश्वरकर हे होते.
या मार्गदर्शन शिबीरा प्रसंगी काळेश्वरकर बोलतांना म्हणाले की नियमाचे पालन करूनच व्यवसाय करावा असे मनोगत या मार्गदर्शन शिबीरा दरम्यान व्यक्त केले. तसेच औषधी विकताना नार्कोटिक ड्रग, शेड्युल औषधे , झोपेच्या गोळ्या , गर्भपाताची औषधे ही तज्ञ डॉक्टर च्या चिट्ठी शिवाय दिल्याचं जाऊ नये त्याचप्रमाणे औषध विक्री करताना फार्मासिस्ट हजर असावा औषधी ची खरेदी विक्री चे रेकॉर्ड व्यवस्थित असावे अश्या आवश्यक त्या सूचना दिल्या . या कार्यक्रमाला जिल्हा संघटनेचे अध्यक्ष पंकज नांनवाणी ,पदाधिकारी संजय पिंपळखुटे, सुनील व्होरा ,संजय बुरले ,गजानन भोकरे यासह तालुक्यातील सर्व औषध विक्रेते मोठ्या संख्येने उपस्थित होते …. कार्यक्रमाचे संचालन तालुका मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष विनय मुनोत यांनी तर आभार प्रदर्शन संतोष कोकुलवार यांनी केले
.