गांधी विचार हाच भारत देशाला समृद्धीला नेऊ शकतो निरंजन टकले यांचे प्रतिपादन

सहसंपादक : रामभाऊ भोयर

महात्मा गांधी यांचा विचार देशाला सदैव त्रिकाल प्रेरणा देणारा राहील गांधी विचाराला कितीही विरोधक म्हणत नसले तरी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची संपूर्ण जीवनपद्धती ही आजच्या पुढच्या व येणाऱ्या पिढीला प्रेरणा देणारी राहील त्यातूनच देशाचा विकास साधला जाऊ शकतो असे मत ज्येष्ठ पत्रकार तथा गांधी विचारवंत निरंजन टकले यांची राळेगाव येथे आयोजित राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंती निमित्त व्यक्त केले स्थानिक बापू फाउंडेशन च्या वतीने घेण्यात आलेल्या व्याख्याना विषयी ते बोलत होते त्यांच्या व्याख्यानाचा विषय राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या स्वप्नातील भारत असा होता यावेळी त्यांनी स्वातंत्र्य काळातील राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या विविध पैलूंचे विवेचन केले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी मुख्याध्यापक रमेश माकोडे हे होते तर व्यासपीठावर माजी शालेय शिक्षण मंत्री प्रा वसंत पुरके यांचीही उपस्थिती होती…… बापू फाउंडेशन च्या वतीने विद्यार्थ्यांकरिता राष्ट्रपिता महात्मा गांधी प्रश्नमंजुषा स्पर्धा घेण्यात आली होती या स्पर्धेत 1000 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला होता प्रथम येणाऱ्या नव स्पर्धकांना राष्ट्रपिता महात्मा गांधी चे सन्मान चिन्ह व रोख रक्कम देऊन गौरविण्यात आले याप्रसंगी नगराध्यक्ष रवींद्र शेराम सुरेंद्र ताठे अशोक राऊत जोत्सना राऊत यांची उपस्थिती होती स्फूर्ती गीते एड सीमा तेलंगे राजू रोहनकर यांनी गायली कार्यक्रमाचे प्रास्ताविक ऍड किशोर मांडवकर यांनी केले… याप्रसंगी बापू फाउंडेशनचे उपनगराध्यक्ष जानराव गिरी प्रदीप ठुने अशोक पिंपरे श्रीधर थुटूरकर. भानुदास राऊत राजेंद्र नागपुरे सुनील भामकर ऍड वैभव पंडित मंगेश राऊत विनोद नरड शशांक केंढे भारत ठूणे सय्यद अफसर अली यांची उपस्थिती होती कार्यक्रमाचे संचालन राजू रोहनकर वैभव पंडित यांनी केले तर कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन प्रदीप ठुने यांनी केले