
बिटरगांव ( बु )प्रतिनिधी// शेख रमजान
ढाणकी:- बिटरगाव ( बु ) पोलिस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या ढाणकी दूरक्षेत्र येथे दिनाक १९ जानेवारी रोजी ठाणेदार प्रेमकुमार केदार यांच्या हस्ते ग्रामीण तसेच शहरी भागातील समस्त पत्रकार बांधवांचा मराठी पत्रकार दिनाचे औचित्य साधुन सन्मान करण्यात आला.
सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून पोलीस स्टेशनचे ठाणेदार प्रेम कुमार केदार हे होते .यावेळी पत्रकार प्रशांत जोशी यांनी आपले पत्रकार बांधव हे जीवाची पर्वा करता प्रशासनातील तसेच परिसरातील घडलेली घटना याची माहिती जनसामान्य लोकांना पोहचविण्यासाठी अहोरात्र मेहनत घेऊन काम करतात त्यांच्या कार्याची दखल घेऊन ठाणेदार यांनी वेळात वेळ काढून आज हा कार्यक्रम आयोजित केला त्याबद्दल त्यांचे आभार मानले . तर अध्यक्षीय भाषणात ठाणेदार यांनी पोलिस प्रशासन आणि पत्रकार हे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत तसेच पत्रकार हा लोकशाहीचा चोथा आधार स्तंभ आहे त्यामुळे लोकशाहीतील प्रथम द्वितीय तृतीय स्तंभ ठामपणे उभे आहेत म्हणून समाजात वावरताना पत्रकारांना एक मान सन्मान मिळावा या उदात्त हेतूने हा आजचा कार्यक्रम आम्ही बिटरगाव पोलीस स्टेशन चे सर्व अधिकारी कर्मचारी यांच्यावतीने करण्याचे ठरवले असे मत ठाणेदार साहेबांनी व्यक्त केले.
सदर कार्यक्रमात उपस्थित पत्रकार बांधवांना पोलिस स्टेशन तर्फे भेट म्हणून रोजनिशी आणि फाउंटन पेन देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी बिटरगाव (बू) पोलिस स्टेशन अंतर्गत ग्रामीण तसेच शहरी भागातील समस्त पत्रकार बांधव तसेच पोलिस कर्मचारी उपस्थित होते
सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वसंत नरवाडे यांनी केले तर आभार प्रदर्शन स.पो. ऊ.नी.शिवाजी टिपूर्णे यांनी केले. अल्पउपहार घेऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
