
सहसंपादक -रामभाऊ भोयर
दिं २४ मार्च २०२३अर्ज करण्याची शेवटचा दिवस , तालुक्यातील २८ गावातील अंगणवाडी केंद्रामध्ये असलेल्या रिक्त जागेच्या पदाकरिता जाहीरनामा काढण्यात आला होता त्याकरिता त्याकरिता २४ मार्च २०२३ अर्ज करण्याचा शेवटचा दिवस असून शेवटच्या दिवशी अंगणवाडी कार्यालयात सेविका व मदतनीसच्या पदासाठी अर्ज भरण्याकरिता महिलांची गर्दी दिसून आली आहे. तालुक्यातील २८ गावातील अंगणवाडी सेविका व मदतनीस च्या जागांची पदभरती होणार असल्याने या गावात अंगणवाडीत सेविका मदतनीस या पद मिळविण्यासाठी इच्छुक महिला उमेदवारांमध्ये चढाओढ पाहिला मिळत आहे.त्यामुळे एक अनार और सौ बिमार अशी परिस्थिती या पदावरून दिसून येत आहे. अंगणवाडी पद भरती बाबत बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालयाने एका पत्राद्वारे २८ ग्रामपंचायतींना सूचना देऊन या पदाबाबत गावात जाहीरनामा लावण्याच्या सूचना दिल्या होत्या यात वाटखेड, एकुर्ली ,वेडशी,खैरी, चिखली (वि ) झुल्लर, वरध, इंजापूर, या आठ गावात सेविका व तेजणी, वाठोडा, वरध, लोणी वडकी आस्टोना सावित्री, झुल्लर, कारेगाव, पिंपळापूर, कारेगाव, दहेगाव, बोरी (इचोड) गारगोटी, देवधरी, खैरी, जळका, रावेरी, जळका, रामतीर्थ, अशा वीस गावात मदतनीस पदभरती होणार असून या गावात अनेकांनी हे पद प्राप्त करण्याच्या हेतूने कागदपत्राचे जुळवाजुळ करायला सुरुवात केली होती अंगणवाडी सेविका किंवा मदतनीस चे नोकरीही सध्या स्थानिक गावातीलच महिलांना मिळत असल्याने गावातील बरेच नागरिक पद मिळवण्यासाठी धावपळ करू लागले आहे तसेच अंगणवाडीच्या बाबतीत सरकारची धोरण सकारात्मक असल्याने व मानधनानतही वाढ होत असल्याने अंगणवाडीतील सेविका व मदतनीस पद आपल्याच बाईला मिळावे यासाठी प्रयत्न दिसून येत आहे.
