
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर
महाराष्ट्र राज्यातील 2005 नंतर शासन सेवेत लागलेल्या सर्व कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना तात्काळ लागू करावी यासाठी पूर्ण महाराष्ट्राभर जुनी पेन्शन बाईक रॅली आयोजित करण्यात आली. त्याला राळेगाव तालुक्यात सुध्दा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आणि सर्व शिक्षक संघटना,महसूल विभाग संघटना,आणि तालुक्यातील सर्व कर्मचारी संघटना यातील बंधू भगिनी यांनी मोठ्या उत्साहात सहभाग नोंदवीला. सदर रॅलीत सर्व संघटनाचे अध्यक्ष, सचिव तथा सदस्य आणि सर्व कर्मचारी यांची जुनी पेन्शन मिळविण्याची तळमळ उल्लेखनीय होती. एकच मिशन..जुनी पेन्शन ह्या घोषणेने संपूर्ण राळेगाव शहर गुंजून उठले.
