वसंतजनमोत्सव समिती विठाळा तर्फे हरित क्रांतीचे प्रनेते महानायक वसंतरावजी नाईक साहेब यांची जयंती साजरी

दिग्रस तालुका प्रतिनिधी शंकर चव्हाण

आज दि.1जुलै कृषी दिन म्हणजेच हरित क्रांतीचे प्रणेते महा नायक, महाराष्ट्र राज्याचे सर्वात जास्त काळ मुख्यमंत्री पदी राहणारे आणि अवघ्या तीन वर्षात हरित क्रांती घडविणारे महानायक वसंतरावजी नाईक साहेब यांची 110 वि जयंती विठाळा येथे अती उत्साहात साजरी करण्यात आली. या प्रसंगी गावातील सर्व प्रतिष्ठित नागरिक हजर होते सर्व प्रथम गावचे प्रथम नागरिक या नात्याने उमेश भाऊ राठोड यांनी महा नायक यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्प हार अर्पण केले वरील कार्यक्रमाचे सूत्र संचालन वसंतजनमोत्सव समितीचे सर्वे सर्वा रीतेश राठोड यांनी केले असून प्रस्ताविक मोफतलाल चव्हाण यांनी केले व आयोजका तर्फे आभार प्रगट करण्यात आले.