
ठाणेदार अजित जाधव यांच्या मार्गदर्शनात अनेक प्रकरणे मार्गी..
प्रतिनिधी : नितेश ताजणे वणी
वणी : पोलीस स्टेशन हद्दीमध्ये मोटरसायकल चोरीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले होते त्यावर आडा घालता यावा. व चोरीचा छडा लागावा या अनुषंगाने पोलीस स्टेशन वणीचे ठाणेदार अजित जाधव व स्थानिक गुन्हे शाखेचे पथक यांच्या संयुक्त विद्यमाने वरिष्ठांच्या आदेशानुसार या गुन्ह्याचा तपास करण्याच्या अनुषंगाने प्रयोजन करण्यात आले होते. वनी पोलीस स्टेशन ठाणेदार अजित जाधव यांनी अमलदारांना विशेष सूचना देऊन गुन्हे उघडकीस आणण्या करता योग्य मार्गदर्शन सूचना दिल्या होत्या . त्याप्रमाणे पोलीस स्टेशन व स्थानिक गुन्हे शाखे यांनी मोटर सायकलच्या चोरीचे प प्रकरणाबाबत सविस्तर माहिती प्राप्त करून संयुक्तरीत्या तपास करीत असताना पोलीस स्टेशन वणी येथील दाखला क्रमांक 85/2023 कलम 379 भारतीय दंड संहिता प्रकरणातील चोरीस गेलेली काळ्या रंगाची अन्टीव्ह मोपेड मोटार सायकल MH 34.BU 0343 किंमत 30,000 रू, काळ्या रंगाच्या 2 हिरो होंडा विनाक्रमांकाची प्रत्येकी 20,000 रू,
लाल चंदेरी रंगाची आयस्माट MH 29 AP 4783 किंमत 30,000 रू प्रमाणे एकूण मुद्देमाल रक्कम 1,00,000 रू एवढ्या किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून
सदर कारवाई ही पोलीस अधीक्षक डॉ. पवन बनसोड, मा. अप्पर पोलीस अधीक्षक पियूष जगताप, मा.पोलिस अधिकारी गणेश कींद्रे, पोलिस निरीक्षक आधरसिंग सोनोने स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ, मा.पोलीस निरिक्षक अजित जाधव यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा पथक वणी येथील सहा.पोलीस निरिक्षक अतुल मोहनकर पोलीस उपनिरीक्षक सुदाम आसोरे,पोलिस स्टेशन वणी, पोहेका विकास धडसे,ना पो कॉ सुधिर पांडे, पो काँ.शुभम सोनुले, सुनील नलगंटीवार सागर सिडाम, यांनी पार पाडली.
