
सहसंपादक : रामभाऊ भोयर
राळेगाव तालुक्यातील अंतरगाव चिखली येथे येत्या 3/1/2025 रोज शुक्रवार पासून तानाजी क्रिडा मंडळाकडून भव्य दिव्य कब्बड्डीचे दोन दिवसीय खुले सामने आयोजीत करण्यात आले असून या सामन्यात प्रथम पारितोषिक अरविंद वाढोणकर, राजेंद्र तेलंगे, राहुल पाटील यांच्या कडून 30,000 रूपये रोख तर शामकांत येणोरकर, महादेव नेहारे सर, तानाजी क्रिडा मंडळाकडून 20,000 रूपये रोख तर तृतीय पारितोषिक भिमराव भगत, गणेश बुरले,पुनम भगत 10,000 रूपये रोख तर चतुर्थ पारितोषिक लोकेश दिवे,मयुर जुमळे यांच्याकडून 7000 रूपये अशी एकूण 67,000 हजार रूपयांची भव्य लुट ठेवण्यात आली असून या सामन्याचे उद्घाटन यवतमाळ वाशीम लोकसभा मतदारसंघाचे खासदार संजय देशमुख व भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे यवतमाळ जिल्हा अध्यक्ष प्रफुल्लभाऊ मानकर यांच्या हस्ते राजेंद्र तेलंगे जानराव गिरी अफसर अली रितेश भरूट उन्मेश पुरके राहुल पाटील प्रविण येंबडवार महेंद्र उमरे विजय बुरले महादेव नेहारे संजय येंबडवार शिल्पा वनकर पोलिस पाटील अंतरगाव यांच्या उपस्थितीत पार पडणार असून बक्षिस वितरण महाराष्ट्राचे माजी शिक्षणमंत्री प्राध्यापक वसंत पुरके सर व कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती इंजिनियर अरविंद वाढोणकर यांच्या हस्ते संदीप सुरपाम सर, भिमराव भगत, सुनील कोवे मेजर, निलेश उमरे, रामभाऊ वगारहांडे, योगेश वनारसे, अभिलाष उमरे,गोपिचंद ढाले, शामकांत येणोरकर, लोकेश दिवे, मयुर जुमळे यांच्या उपस्थितीत पार पडणार असून हे कबड्डीचे खेळ नियम व अटी नुसार खेळवले जाणार असून 50 किलोमीटर अंतरावरील खेळाडूंना भोजनाची व्यवस्था करण्यात आली असून क्रिडा प्रेमींनी खेळाचा लाभ घ्यावा असे आवाहन मंडळातर्फे प्रज्वल सोनवणे अविनाश वगारहांडे शिवम ठाकरे शैलेश ठाकरे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.
