तलाठी बद्दलीसाठी ग्राम पंचायतने घेतला ठराव

राळेगाव तालुक्यातील आंजी हे गाव पेशामध्ये येथे या गावात स्वतंत्र ग्रामपंचायत आहे. गावात तलाठी येतच नाही या प्रकारची माहिती गावकऱ्यांनी ग्रामपंचायत पदाधिकारी सरपंच, उपसरपंच, सदस्य यांना दिली दिनांक ३० जुन रोजी ग्रामसभा घेऊन आंजी येथील तलाठी बदलून देण्यात यावा असा सभेमध्ये ठराव घेण्यात आला कारण तलाठी गावातच येत नाही. फोन केला असता उचलत नाही उचल्ला तर तुम्हाला काम नाही आहे का, तुमच्या मोबाईल मध्ये जास्त पैसे आहेत का अशी उद्धट वागनूक गावातील तलाठ्याकडून मिळत आहे. आंजी येथे शासनाने लाखो रुपये खर्चून सुंदर असे तलाठी कार्यालय बांधले आहे मात्र ते कार्यालय धुळ खात आहे. सध्या शेतकरी शेतीच्या कामासाठी व्यस्त आहे शासनाने एक रुपयात पिक विमा काढन्याचे आश्वासन दिले आहे व याबाबत तहसील कार्यालया मार्फत शेतकऱ्यांनी पीक विमा काढवा यासाठी आव्हान करण्यात आले आहे व स्वत तहसीलदार अमित भोईटे हेही अनेक गावात व शेतीच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांना पीक विमा योजना व पीकपेरा बाबत माहिती देत आहे. परंतु आंजी गावाचे तलाठी गावात येत नाही आम्हाला कोणत्याही प्रकारची माहिती देत नाही पिक विमा काढण्यासाठी विविध कागदपत्रे तलाठी यांच्या कडून घ्यावे लागतात पण तलाठी केव्हा राळेगाव, तर वाढोणा बाजार येथे आहे म्हणून सांगतात आम्हाला आर्थिक खर्च करून तलाठ्याचा शोध घ्यावा लागत आहे. तसेच आमच्या गावातील तलाठ्याकडून आम्हाला अपमानास्पद वागनूक मिळत आहे त्यामुळे आमच्या गावाचा तलाठी बदलून देण्यासाठी आम्ही राळेगाव उपविभागीय अधिकारी मेघना कवाली तसेच राळेगाव तहसीलदार अमित भोईटे यांना ग्रामपंचायत ठराव तसेच निवेदन देण्यात आले आहे. यावेळी सरपंच ताराबाई सोयाम उपसरपंच, बंडू पवार सर्व सदस्य तसेच शेतकरी सुद्धा मोठ्या संख्येने उपस्थित होते व त्वरीत तलाठी यांची बद्दली करून द्यावी अशी मागणी आंजी येथील गावकरी यांनी केली आहे.
आंजी येथील गावकऱ्यांनी दिलेल्या निवेदनावरून व ग्राम पंचायतनी घेतलेल्या ठरावावर तलाठी यांना नोटीस देऊन माहिती घेऊन तसा अहवाल उपविभागीय कार्यालात यांच्याकडे पाठवून योग्य कार्यवाही केली जाईल.
अमित भोईटे
तहसीलदार राळेगाव
