
कृष्णा चौतमाल ता. प्रतिनिधी हदगांव
हदगांव – तालुक्यातील कोळी येथे लोकशाहीर साहित्य रत्न अण्णाभाऊ साठे यांची जयंती मिरवणूक साजरी करण्यात आली. गेल्या २ वर्षांपासून जगभरात कोरोना ची लाट असल्यामुळे २ वर्ष जयंती साजरी करण्यात आली नव्हती. परंतु यावर्षी कोरोना लाट ओसरल्यामुळे लोकसहित्य अण्णाभाऊ साठे यांची जयंती गावकऱ्यांनी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
१ ऑगस्ट १९२० रोजी सांगली जिल्ह्यातील वाटेगाव येथे उपेक्षित समजल्या जाणाऱ्या मातंग समाजात अण्णाभाऊ साठे यांचा जन्म झाला. त्यांच्या वडिलांचे नाव भाऊराव तर आईचे नाव वालबाई असे होते. त्यांच्या बहिणीचे नाव जाईबाई असून भावाचे नाव शंकर भाऊ साठे असे आहे. अण्णाभाऊ साठे यांनी दोन विवाह केले.
अण्णा भाऊ साठे यांचे साहित्य हे परिवर्तनाला दिशा व चालना देणारे ठरले आहे. महाराष्ट्राच्या एकूणच जडणघडणीत आणि परिवर्तनात या साहित्याचे योगदान हे महत्त्वपूर्ण मानले जाते. आजही मोठ्या संख्येने विद्यार्थी व अभ्यासक हे त्यांच्या या साहित्याचा संशोधनात्मक अभ्यास करताना दिसतात. संयुक्त महाराष्ट्र चळवळ लोकमानसात रुजविण्याचे काम शाहीर अण्णा भाऊ साठे, शाहीर अमर शेख आणि शाहीर द.न. गव्हाणकर यांनी केले. मुंबई, मराठवाडा, विदर्भ, कोकण, पश्चिम महाराष्ट्र तसेच सीमाभागातील अनेक ठिकाणी शाहिरांनी आपल्या लालबावटा कलापथकाचे कार्यक्रम सादर.
अण्णा भाऊ साठे हे दलितांचे आणि विशेषतः मातंग समाजाचे प्रतीक बनले आहेत. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनची स्थापना १९८५ मध्ये मांग समाजातील लोकांसाठी करण्यात आली.
अशा या महामानवाची जयंती मिरवणूक आज कोळी येथे साजरी करण्यात आली. यावेळी उपस्थित कोळी गावचे उपसरपंच संतोष चौतमाल , मा. उप सरपंच गजानन जगताप , निवघा पोलीस चौकीचे सुरक्षा रक्षक , गावचे तंटामुक्ती अध्यक्ष गंगाधर पाटील कोळीकर , जयंती अध्यक्ष प्रभाकर गायकवाड , दयानंद गायकवाड , उत्तम गायकवाड , नागोराव वाघमारे , कृष्णा चौतमाल , रामा गायकवाड , गोविंद जगताप , ऋषी चौतमाल , किशोर क्षीरसागर , मारोती गायकवाड , सुनील गायकवाड , गोलू जगताप आदी मान्यवर उपस्थित होते.
