
सहसंपादक : रामभाऊ भोयर
दिनांक१६ ऑगस्ट शुक्रवार ला उपविभागीय,तहसील कार्यालय राळेगाव येथे बिरसा ब्रिगेडच्या वतीने बिरसा ब्रिगेडचे अध्यक्ष डॉ.अरविंद कुळमेथे यांच्या नेतृत्वात शेतकरी, शेतमजूर बेरोजगार युवक व महिलांच्या हक्क अधिकारासाठी ,राळेगाव विधानसभा क्षेत्रातल्या समस्यां विषयी एक दिवसीय लाक्षणिक धरणे आंदोलन करण्यात आले.या आंदोलनात जनतेला संबोधित करतांना डॉ.अरविंद कुळमेथे मनाले की आजी माजी आमदारांच्या निष्क्रियतेने राळेगाव मतदार संघ समस्यांच्या विळख्यात सापडला आहे,मतदार संघातील जनता समस्येने त्रस्त आहे, तेव्हा जनतेने रस्त्यावर उतरलं पाहिजे, आपल्या हक्क अधिकारासाठी लढले पाहिजे तेव्हाच आपल्या जनतेच्या प्रश्नांकडे या मुख्या, बहिऱ्या,आंधळ्या या लोकप्रतिनिधींच लक्ष जाईल.
या आंदोलनामध्ये प्रामुख्याने
राळेगाव विधान सभा क्षेत्रा मध्ये अवैद्य धंदे याच्यात फार मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे. त्यामुळे गुन्हेगारी वाढत आहे. त्यामुळे ते अवैद्य धंदे तात्काळ बंद करण्यात यावे,राळेगाव शहरातले मुख्य मार्गावरील स्ट्रीट लाईट हे मागील सात-आठ महिन्यापासून बंद आहे तरी ते तात्काळ सुरू करण्यात यावे. व कळंब,बाभूळगाव शहरात स्ट्रीट लाईट बसवावे,राळेगाव,कळंब,बाभूळगाव तालुक्यातील शेतकऱ्यांना मागील वर्षापासून पिक विमा मिळाला नाही तरी तो तात्काळ देण्यात यावा,शेतकऱ्यांची कर्ज माफी पूर्णतः करावी,शेतकऱ्यांना बँकेचे कर्ज,क्रॉप लोन तात्काळ देण्यात यावे,पाऊसा मुळे शेतकऱ्यांचे झालेले नुकसान त्यांच्या शेताचे सर्वे करून शासनाने शेतकऱ्यांना नुकसन भरपाई देण्यात यावी,बेंबळा प्रकल्प कालव्याची पुनर्रचना करून व बेंबळा प्रकल्प पुर्ण करून त्या बेंबळा प्रकल्पाचे पाणी राळेगाव,कळंब बाभुळगाव तालुक्यातील शेतकऱ्यांना वर्ष भर उपलब्ध करून देण्यात यावे,MIDC कळंब,राळेगाव,बाभुळगाव येथे सुरू करावी,राळेगाव,बाभुळगाव,कळंब येथे विद्यार्थांसाठी ग्रंथालय,वाचनालय,क्रीडांगण, व्यायाम शाळा निमार्ण करून द्याव्या,राळेगाव, कळंब,बाभुळगाव व यवतमाळ जिल्यातील आदिवासी गावांना पेसा मध्ये समाविष्ट करावेत,अतिक्रमण धारक शेतकऱ्यांना जमिनीचे पट्टे तत्काळ देऊन त्यांना त्यांचा ७/१२ नावी करून द्यावा,कळंब ते वडकी या रोडवर दोन टोल नाके आहेत. हा कळंब ते वडकी रोड ग्रामीण भागातला रोड असून सुद्धा त्यावर टोल वसुली सुरू आहे. ते दोन्ही टोल नाके तात्काळ बंद करण्यात यावे,मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी लागणाऱ्या कागदपत्राची मध्ये शिथिलता आणावी व आधार कार्ड हेच प्रमाणित कागदपत्र समजून सरसकट सर्व महिलांना ही योजना लागू करण्यात यावी,राळेगाव,कळंब,बाभुळगाव शहरातील जनतेला पिण्यासाठी शुद्ध पाणी मिळत नाही. पिण्याच्या पाण्याचा फार तुटवडा आहे. तरी तात्काळ पिण्याच्या शुद्ध पाण्याची व्यवस्था राळेगाव,कळंब,बाभूळगाव शहरातील रहिवाशांना करून देण्यात यावी,शेतकऱ्यांचे स्वस्त धान्य सरकारने बंद केलेले आहे तरी ते पूर्वीप्रमाणे सुरू करून शेतकऱ्यांना तात्काळ देण्यात यावे,शेतकऱ्यांना शेतामध्ये जाण्यासाठी लागणारे पांदण रस्ते तात्काळ मोकळे करून देण्यात यावे व ते पक्के बांधून द्यावेत,राळेगाव येथील आदिवासीच्या स्मशानभूमीचे सौंदर्यकरण करून तेथे रस्ते, लाईट व पाण्याची व्यवस्था करून देण्यात यावी,आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाच्या योजना आदिवासी समाजापर्यंत पोहोचत नाही. त्याचा लाभ आदिवासी समाजाला मिळत नाही. त्यामुळे आदिवासी प्रकल्प कार्यालयाची एक शाखा राळेगाव मध्ये निर्माण करण्यात यावी, निराधारांणा ५००० रुपये महिना करण्यात यावा, राळेगाव विधानसभेतील रस्त्यांच्या डांबरीकरण करून तात्काळ दुरुस्त्या करण्यात याव्या, बाभुळगाव मध्ये आदिवासी मुला मुलींचे वस्तीग्रह सुरू करण्यात यावे. इत्यादी मागण्यांचे निवेदन उपविभागीय अधिकारी राळेगाव यांना या लाक्षणिक धरणे आंदोलनातून देण्यात यावेळी बिरसा ब्रिगेडचे अध्यक्ष डॉ.अरविंद कुळमेथे, प्रदेश संघटक प्रा. वसंत कनाके, तालुकाध्यक्ष राळेगाव महादेव मेश्राम , प्रमोद ईरपाते, सुरज मरस्कोल्हे, उमेश येरमे, नानाजी कनाके, समीर वडे ,विठ्ठल किनाके, परमेश्वर जुमनाके, अजय जुमनाके,शंकर यडसकर, धनराज जुमनाके सर , अजाबराव कोरांगे,रोशन घोडाम, प्रतिभा ईवनाते, गणेश घोडाम, मनोज वाके, चिकू उजवणे , कल्पना कनाके, रमेश मेश्राम, गोविंदा मेश्राम, प्रकाश फुलमाळी, प्रशांत फुलमाळी व शेतकरी, शेतमजूर, युवक ,महिला आदी उपस्थित होते.
