
पोलीस स्टेशन वडकी येथे दिनांक १२/८/२०२३ रोजी विविध गुन्ह्यांमध्ये पकडण्यात आलेल्या देशी व विदेशी दारूच्या ८९ गुन्ह्यांमधील एकूण मुद्देमाल १२ ६७७ बॉटल ज्याची किंमत १२ लाख१४२ रुपये आहे त्या न्यायालयाकडून निकाल लागल्यामुळे व अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क यवतमाळ यांच्या परवानगीने सदर दारूच्या देशी व विदेशी बाटल्या चा मुद्देमाल पोलीस स्टेशन मैदानात निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क पांढरकवडा यांचे उपस्थितीत पंचा समक्ष जेसीबीने मोठा खड्डा करून त्या खड्ड्यात दारू खाली करून मुद्देमाल नष्ट करण्यात आला. या महिन्यांमध्ये एकूण ११८ गुन्ह्यातील मुद्देमाल नष्ट करण्यात आला आहे.
