
सहसंपादक : रामभाऊ भोयर
दिनांक८.ऑगस्ट रोजी विश्रामगृह यवतमाळ येथे भारत राष्ट्र समितीच्या जिल्हा बैठकीमध्ये सामाजिक चळवळीमधील नेते माननीय गोपाल भाऊ आडे त्यांनीअसंख्य कार्यकर्त्यांसह प्रवेश घेतला प्रवेश करतेवेळी त्यांना राळेगाव विधानसभेची जबाबदारी देण्यात आली.
महाराष्ट्रात नव्यानेच निवडणूक रिंगणात उतरलेल्या तेलंगाणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांच्या भारत राष्ट्र समिती या पक्षाने महाराष्ट्रात सर्व प्रकारच्या निवडणुका लडविणार असल्याचे जाहीर केले असून भारत राष्ट्र समितीचे सर्व कार्यकर्ते पक्ष वाढीबरोबरच निवडणुकीच्या बांधणीकरिता कामाला लागले आहे तेच उद्देश डोळ्यासमोर ठेऊन भारत राष्ट्र समितीचे यवतमाळ जिल्हा समन्वयक माजी आमदार प्रा.श्री. राजूभाऊ तोडसाम, नानाभाऊ गाडबैले, डॉ.सुभाष भाऊ राठोड यांच्या प्रमुख उपस्थितीत सामाजिक चळवळीतील नेते गोपाल भाऊ आडे यांनीअसंख्य कार्यकर्त्यांसह पक्षात प्रवेश केला. त्यांच्यावर राळेगाव विधानसभेची जबाबदारी सोपविण्यात आली.
प्रवेश करते वेळि पश्चिम विदर्भ सह समन्वयक डॉ सुभाष राठोड . यवतमाल समन्वयक नाना भाउ गाडबैले राळेगाव विधानसभा समन्वयक आशिष भोयर ,वणी समन्वयक सतिस दरेकर विनोद चुनारकर आकाश धनकसार संतोष कांबळे वानखेड़े यांच्या उपस्थिति पक्ष प्रवेश करण्यात आला त्यावेळी गोपाल भाऊ आडे यांच्यासोबत असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.
