
राळेगाव तालुका प्रतिनिधी रामभाऊ भोयर
जुलै महिन्यात अतिवृष्टीमुळे पिकांचे खूप नुकसान झाले नुकसान मदत मिळाली नाही तोच अतिवृष्टीतून वाचलेल्या सोयाबीन पिकावर येलो मोझॅकचा अटॅक झाल्याने शेतकऱ्यांचे सोयाबीन ह्या पिकाचे खूप नुकसान झाले. मात्र दोन्ही नुकसानीची अजून पर्यंत शेतकऱ्यांना आर्थिक मदत सरकारकडून मिळाली नाही . दसरा, दिवाळी सारखा सण जवळ आला असून सरकार सरकारी कर्मचाऱ्यांचे बोनस जाहीर करते परंतु जगाच्या पोशिंदा शेतकरी बांधवांना आर्थिक नुकसान मदत जाहीर करत नाही यामुळे शेतकरी बांधवांचे दसरा दिवाळी सण अंधारात जाते की काय? या विवंचनेत शेतकरी बांधव दिसत असल्याचे चित्र दिसत आहे.
जुलै महिन्यात २१ जुलै व त्यापुर्वी व त्यानंतरही पाऊस झाला, यामध्ये तालुक्यात अनेक ठिकाणी अतिवृष्टी झाली.नदी, नाल्या काठची पिके खरडून गेली, ढगफुटी झालेल्या काही भागांमध्ये शेत जमिनी शेती योग्य राहील्या नाहीत. पुढील काही काही वर्ष तेथे शेती केली जाऊ शकेल की नाही याचीही शाश्वती देता येणार नाही. हजारो लाखो हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले. अतिवृष्टीमुळे तालुक्यातील, जिल्हातील अनेक गावे पाण्याखाली गेली, त्यांची घरे दारे, गुरे ढोरे वाहून गेली. हे शेतकऱ्यावरचा संकट जाते न जाते तोच सोयाबीन या पिकावर येलोमोझाक चा अटॅक येऊन सोयाबीन या पिकाचे खूप नुकसान झाले. सरासरी सर्व शेतकऱ्यांनी पिक विमा काढला असल्यामुळे पीक विम्याची तरी मदत मिळेल अशी आशा शेतकरी बांधवांना होती. अतिवृष्टी ग्रस्त मदत तर अजून पर्यंत मिळालीच नाही त्यात आता सोयाबीनचे झालेले नुकसान याचा पीक विमा अशा दोन्ही मदती दसरा, दिवाळी या सणासाठी मिळेल अशी शेतकरी बांधवांना आशा होती. परंतु शासनाकडून अधिवेशन काळात कुठल्या ठोस मदतीची घोषणा करण्यात आली नाही व आज पावेतो शासनाकडून कुठलीही ठोस मदत अजूनपर्यंत देण्यात आली नाही.
आता दसरा दिवाळी सारखा सण-उत्सव अगदी जवळच आला असून सरकारकडून कुठलाही ठोस निर्णय झाला नसल्यामुळे शेतकरी बांधवांना आर्थिक मदत मिळाली नसल्यामुळे शेतकऱ्यांचा दसरा व दिवाळी हा सण अंधकारमय होतो की काय? असे चित्र दिसत आहे. सरकारी कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस जाहीर होत आहे परंतु जगाचा पोशिंदा असणाऱ्या शेतकरी बांधवांना अजून पर्यंत कुठलाही नुकसान मदतीचा ठोस निर्णय सरकार का घेत नाही ? असा प्रश्न शेतकरी बांधव करीत आहे. तेव्हा सरकारने अतिवृष्टी नुकसान मदत व सोयाबीन पीक नुकसानीचा पिक विमा अशा दोन्ही नुकसान मदत ह्या शेतकऱ्यांना आता दसरा तर जवळच आला आहे तेव्हा दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावी अशी शेतकरी बांधवाकडून मागणी होत आहे. मात्र सरकार शेतकऱ्यांच्या खात्यात अतिवृष्टी नुकसान मदत व पिक विमा जमा करते की शेतकऱ्यांची दसरा, दिवाळी हे सण अंधकारात जाते याकडे शेतकरी बांधवांचे लक्ष लागून आहे .
