
सहसंपादक : रामभाऊ भोयर
रावेरी गावात एन. एस. एस. विद्यार्थ्यांनी केले श्रमदान= राळेगाव :- न्यू इंग्लिश कनिष्ठ महाविद्यालय राळेगाव चे राष्ट्रीय सेवा योजना शिबिराचे यशस्वी आयोजन राळेगाव तालुक्यातील रावेरी येथे संप्पन्न झाले. राष्ट्रीय सेवा योजना शिबीराचा उदघाटन सोहळा 27 डिसेंबर रोजी पार पडला या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून न्यू एज्युकेशन सोसायटी चे अध्यक्ष बि. के. धर्मे हे उपस्थित होते तर कार्यक्रमाचे उदघाटक म्हणन ग्रामपंचायत रावेरी चे उपसरपंच गजानन झोटिंग हे उपस्थित होते तर कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे न्यू एज्युकेशन सोसायटी च्या सचिव डॉ. अर्चनाताई धर्मे, मुख्याध्यापक विजय कचरे,वामनराव तेलंगे, नितीन हिवरकर, रमेश डोंगरे, सौं चंदाताई पिंपरे, उपमुख्याध्यापक सुरेश कोवे, राष्ट्रीय सेवा योजना प्रभारी प्रा. प्रवीण चौधरी, प्रा. रवि चिकाटे, प्रा. साक्षी धूम्मणवार, प्रा. प्रियंका नागतोडे असे अनेक पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. राष्ट्रीय सेवा योजना शिबिरातून रावेरी गावात रस्त्याची सफाई, गावात शोषखड्डे निर्माण करण्यात आले,तसेच दररोज ग्राम सफाई करण्यात आली आहे. त्याचं प्रमाणे राष्ट्रीय सेवा योजना शिबिरात एड. रोशनीताई वानोळे, जिल्हा समन्व्यक प्रा. गजानन जाधव आणि प्रा बाराहते, यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ, केंद्र प्रमुख व पर्यवेक्षक सूचित बेहरे, केंद्र संयोजक विनोद चिरडे, नितीन जुनूनकर,तालुका योग शिक्षण व प्राणायाम प्रमुख डॉ. बि. के. कोकरे व एन. जी. ओ. कु. वाघमारे मॅडम यांनी विद्यार्थी व गावाकऱ्याना विविध बौद्धिक विषयावर मार्गदर्शन केले. त्याच प्रमाणे 2 जानेवारी रोजी या राष्ट्रीय सेवा योजना शिबिराचा विदयार्थ्यांनी रंगारंग नृत्य आयोजित करून समारोप सुद्धा करण्यात आला दिनांक 27 डिसेंबर पासून तर 2 जानेवारी पर्यंत एन. एस. एस. च्या मुलांनी आपल्या श्रमदानातून आणि अनेक चांगल्या वक्त्यांच्या व्याख्यानातून आपला व ग्रामस्थाचा सर्वांगीण विकास करण्याचा प्रयत्न यावेळी केल्यामुळे रावेरी ग्रामस्था मध्ये समाधान व्यक्त करण्यात येत आहे…
