गुळगुळीत वाटणाऱ्या महामार्गाला लागत आहे ठिगळाचे तोरण


प्रतिनिधी:: प्रवीण जोशी
ढाणकी


ढाणकी शहराजवळ फुलसावंगी रोड पासून महामार्गाचे काम गेल्या अनेक दिवसांपासून चालू आहे विशेष म्हणजे हजारो झाडाची कत्तल करून हा महामार्ग होत असताना पर्यावरणाची प्रचंड प्रमाणात हानी झाली हे नाकारून चालणार नाही ती झाडी वाढण्यासाठी कितीतरी वर्ष खर्ची गेले असतील तेव्हा कुठे ती वृक्ष येणाऱ्या जाणाऱ्या वाटसरूंना हिरवी गर्द सावली देण्यासाठी उभे ठाकली असतील पण या सर्वांची कत्तल करून हा महामार्ग होत आहे. जन्मलेल्या बाळाचे नामकरण विधी काही दिवसात होतो तसाच प्रकार या महामार्गाला अनुसरून दिसतो आहे अवघे काही वर्ष झाले असेल या ठिकाणी या महामार्गाला भेगा पडल्या आणि लगेच ठीगळजोड प्रकल्प सुसाट पणे कामाला लागला यावरून रस्ता कोणत्या दर्जाचा झाला आहे हे सर्वसामान्य जनतेला कळते काही दिवसापूर्वीच उमरखेड येथे महामार्गावर अपघात होऊन पीरंजी येथील तरुण गंभीर जखमी झाले त्या महामार्गाचे काम सुद्धा अत्यंत संथ पद्धतीने चालू असून यामध्ये जास्तीत जास्त तरुणच बळी पडत असून शासनाने सुद्धा कुठेतरी आत्मचिंतन करण्याची गरज आहे. शासन महामार्गाचे काम करणाऱ्या कंपनीवर व कंपनी अभियंत्यावर “फिदा” आहे का??असा सुद्धा प्रस्न यावेळी उपस्थिती होतो

शासन एकाच रस्त्याच्या कामासाठी लाखो रुपये गुंतवत असते परंतु या पैशाची योग्य रस्ता बनविण्यासाठी तजवीज होणे गरजेचे आहे अनेक वेळा रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे होते व त्याचा फटका कामाच्या गुणवत्तेवर बसून निकृष्ट दर्जाचे रस्ते बनले जातात त्यामुळे एकाच राष्ट्रीय महामार्गासाठी काही वर्षात पुन्हा पैसे खर्च करण्याची वेळ येते व गुळगुळीत असलेल्या रस्त्याला खड्ड्याचा रस्ता म्हणत असेल तू चाल पुढे मी येतो तुझ्या पाठीमागे मागे अशी परिस्थिती सध्या तरी दिसत आहे आता जी काही ठीगळ जोडून टाप टीप पणाचा आव कंपनी दाखवत आहे तो केवळ दिखावा असून येड्याची समज फड्याने काढण्याचा उत्तम प्रयोग आहे काही महिना नाही तर अवघ्या काही दिवसात ठीगळ प्रकल्प आपला परिणाम दाखवेल हे सगळे काही दिवसापूरते दाक्षायणी व सोगांचा एक प्रकार असून ते सोंग किती दिवस टिकेल हे येणारा काळच ठरवेल एवढं सगळं असताना सरकार आणि प्रशासन रस्ता बनवणाऱ्या कंपन्यांना कारवाई का करत नाही हा एक सर्वसामान्यांना पडलेला प्रश्नच आहे नक्कीच शासन रस्त्यासाठी भरपूर निधी पुरवतो आहे पण अशा ढिसाळ पद्धतीने राबविणारी यंत्रणा असेल तर खरंच उत्कृष्ट पद्धतीचे रस्ते बनतील का आणि बनलेले रस्ते किती दिवस काम करतील हा सुद्धा आत्मचिंतनाचा गंभीर विषय आहे केंद्रीय मंत्री मा.नितीनजी गडकरी यांनी वारेमाप रस्त्यासाठी प्रयत्न केले आणि ते सत्यात आणणारी फळी कुठेतरी “वाळवी” चा प्रयोग ठरत आहे त्यामुळे सगळे काही ओके असेल असे नाही यामध्ये पालकमंत्री यवतमाळ जिल्हाधिकारी यांनी होणाऱ्या महामार्गाची तात्काळ दखल घेऊन कंपनीवर दंडात्मक कारवाई करायला पाहिजे किंवा होणाऱ्या कामाची चौकशी करून योग्य काम होत आहे का नाही हे बघायला पाहिजे शेवटी पैसा हा सर्वसामान्य जनतेचा आहे विशेष म्हणजे रस्ता बनवत असताना कंपनीला पोषक अशाच नियम व अटी बनत कशा काय असतील हा एक संशोधनाचा विषय आहे तसेच रस्ता बनत असताना रस्त्याची उंची वाढली परिणामी शेत खाली व रस्ता उंच झाल्यामुळे यावेळी शेतकऱ्यांना रब्बी हंगामातील आपला माल काढण्यासाठी जी यंत्रे न्यावी लागतात ते नेताना बरीच कसरत करताना बघितले त्यामुळे सरकार याला अनुसरून संबधित कंपनीवर काय कारवाई करेल याकडे या भागाच्या जनतेचे लक्ष लागले आहे