ससनकर गुरुजी नी आपल्या दोन ही मुलांच्या लग्नात केला वृध्दांना सामाजिक माणुसकीचा आहेर…….!!

राळेगाव तालुका प्रतिनिधी:- रामभाऊ भोयर


राळेगाव येथे आयोजित करण्यात आलेल्या आयुष्याच्या रेशीम गाठी आणि माणुसकीचं नातं जपनारं कुटुंब गिरीधर ससनकर आणि नवं दांम्पत्य अभिजित आणि प्रतिक्षा यांच्या मंगलमय सोहळ्यात होते माणुसकीचं दर्शन आणि सामाजिक बांधिलकी…..!!
भारतीय संस्कृती आणि सभ्यता कमी होताना दिसत आहे आपुलकी च्या नात्यात दुरावा होताना दिसतोय,ही खंत ससनकर गुरुजी च्या मनाला लागत होती म्हणून समाजातील लोकांना नवी प्रेरणा मिळावी यासाठी आपल्या मुलीच्या लग्नाला मुस्लिम समाजातील बालकांना कपडे वाटप करुन पारधी समाजातील नासमज गरिब लोकांना एकत्र करून भोजन केले ही भारतीय संस्कृती मधली सामाजिकता जपनारी नाती होती
काल झालेल्या अभिजित आणि प्रतिक्षा यांच्या लग्न सोहळ्यात माऊली वृद्धाश्रम धोतरा येथिल सर्व वृध्दांना लग्नाच्या आहेर म्हणून वृध्द माऊली ला लुगडं आणि वृद्ध वडिलांना धोतर कुर्ता देवुन आशिर्वाद घेतले ही मानवतावादी संकल्पना राष्ट्रसंतांच्या अर्पण केली या मंगलमय सोहळ्यात सहभागी मा.मधुसुदन कोवे गुरुजी अध्यक्ष ग्राम स्वराज्य महामंच यांना आमंत्रित करुन माऊली वृद्धाश्रम चे प्रमुख मा सुरेंद्र जी रुदाक्षवार आणि सर्व वृध्दांना सोबत घेऊन भोजन केले
अशा या सामाजिक बांधिलकी च्या कौटुंबिक मंगलमय सोहळ्यात सहभागी परिवारातील गरिब कुटुंब श्रीमंत कुटुंब मित्र परिवार, सामाजिक कार्यकर्ते, राष्ट्रसंत विचार धारेतिल मित्र परिवार राजकीय पुढारी, सेवा निवृत्त कर्मचारी, अधिकारी, सामाजिक बांधिलकी जपनारी नातेवाईक या मंगलमय सोहळ्यात उपस्थित होती मा.गिरीधरजी ससनकर गुरुजी कार्याध्यक्ष ग्राम स्वराज्य महामंच यांनी सर्व सहकारी आणि सहभागी मित्र परिवाराचे आभार मानले…….!!