
पोंभूर्णा ता. प्रतिनीधी:- आशिष नैताम
मौजा गंगापूर नवीन येथील शेतकऱ्याना सोबत घेऊन मा.सुधीर भाऊ मुनगंटीवार आमदार बल्लारपूर विधानसभा यांना माहिती दिली असता लगेच जिल्हा अधिकारी यांना भाऊंनी भ्रमणध्वणी द्वारे गंगापूर नवीन येथील शेतकऱ्यांना संगणीकृत सातबारे देण्यासाठी सूचना केली. त्यासाठी आज गंगापूर येथील शेतकऱ्यांना घेऊन मा. शेलवटकर सर तहसीलदार पोंभुर्णा यांना नवीन गंगापूर येथील शेतकऱ्यांचे सातबारा सांगनिकृत करून देण्यात यावे यासाठी निवेदन देण्यात आले. मौज नवीन गंगापूर येथील सातबारे संगणीकृत भेटत नसल्यामुळे शेतकऱ्यांना कोणत्याही योजनेचा लाभ घेता येत नाही आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मिळणाऱ्या योजने पासून या शिवरातील शेतकरी वंचित आहेत. त्यामुळे आज निवेदन देताना अल्का आत्राम प्रदेश महामंत्री, नारायण बोन्डे, मोरेश्वर राऊत, सुधाकर शिंदे, धनराज वाकूडकर, गिरीधर खेडेकर, किशोर पुप्पलवार, दिवाकर शिंदे, संजय मराठे, चिंतामणी खेडेकर, निलेश सातरे, केशव शिन्दे, रणपती वडस्कर उमेश सिडाम आणि सर्व शेतकरी बांधव उपस्थित होते.
