
सहसंपादक : रामभाऊ भोयर
शासनाने शेतकऱ्यांना शेतीवर जाण्यासाठी सोबतच छोटे छोटे गाव अंतर्गत जोडण्यासाठी पांदण रस्त्याची योजना सुरू केली असून या योजनेचा लाभ बऱ्यापैकी गावातील लोकांना झाला असून अशाचप्रकारे या वर्षी राळेगाव तालुक्यातील वरूड जहांगीर ते झरगड हा पांदण रस्ता या वर्षी अर्धाअधिक करण्यात आला असून रस्त्याचे काम मशीनद्धारे करत असतांना भावसिंग वडते यांच्या शेताजवळील रस्ता केला असता रस्त्याच्या कडेला असलेल्या मोठ्या झाडाच्या आजूबाजूची माती उकरून काढून रस्त्यावर टाकल्यामुळे झाडाच्या मुळाशी माती न राहील्यामुळे मागील झालेल्या हवेत ते झाडं रस्त्याच्या मध्यभागी पडल्यामुळे हा रस्ता बंद झाला असून रस्ता सुद्धा लेव्हल न मारता खोडं मुळ्या दाबून रस्ता बनवल्यामुळे शेतकऱ्यांना जाण्यासाठी त्रास सहन करावा लागत असून उन्हाळा असल्याने शेतकरी आजूबाजूच्या शेतातून जाणे येणे करत असून पुढे येणाऱ्या पावसाळ्यात मात्र शेतीच्या कामासाठी जायचे असल्यास किंवा शेतीसाठी रासायनिक खते वगैरे न्यायची असल्यास शेतकऱ्यांसमोर मोठा कठीण प्रश्न निर्माण झाला असून हा पांदण रस्ता कोणत्या खात्या अंतर्गत येतो याची चौकशी करून हे झाड रस्त्याच्या बाजूला सारून रस्ता मोकळा करून देण्याची मागणी वरूड जहांगीर येथील शेतकरी तुळशीराम वडते,भावसिंग वडते,मोहन राठोड तथा इतर शेतकऱ्यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केली आहे.
