मातब्बर नेत्यांच्या हस्ते खरेदी विक्री संघ राळेगाव येथे नामकरण सोहळा साजरा

राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225)

राळेगाव येथील खरेदी विक्री संघ ही संस्था गेल्या खूप वर्षापासून कार्यरत असून तेथे जवळपास वीस ते तीस गाळे बांधण्यात आले आणि ते सर्व बांधून शेतकरी हा कसा सुखी राहील या करिता सर्व तो परी प्रयत्न करण्यात येईल व खरेदी विक्री संघ हा आज रोजी खूप हलाखीत आहे असे अध्यक्ष मिलिंदभाऊ इंगोले यांनी सणीतले आपल्या प्रास्ताविकात स्व, बाबासाहेब मानकर यांच्या नावाने आज रोजी नामकरण होत असल्याने नवीन प्राणजोत मिळत आहे असे सुद्धा बोलले, स्वर्गीय बाबासाहेब मानकर यांच्या नावाने आज रोजी नामकरण विधी करण्यात आला त्या कार्यक्रमाचे उद्घघाटक महाराष्ट्र राज्याचे माजी प्रदेशाध्यक्ष श्री माननीय माणिकरावभाऊ ठाकरे हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी मंत्री मा. शिवाजीराव मोघे साहेब व माजी शालेय शिक्षणमंत्री वसंतरावजी पुरके सर हे आवर्जून उपस्थित होते त्यामध्ये त्यांनी भविष्यात होणाऱ्या शेतकरी विरोधी बिल केंद्र शासनाने पारित केलेले यांना विरोध काय म्हणून करायचा यावर सर्वांनी सर्वतोपरी त्याच्यात असलेल्या त्रुटी यावर मार्गदर्शन केले त्यामध्ये प्राध्यापक वसंतरावजी पुरके सर यांनी संपूर्ण सहकार क्षेत्र काय असते आणि आज रोजी काय आहे यावर पूर्ण माहिती दिली तसेच माणिकरावभाऊ ठाकरे यांनी सुद्धा खूप मोलाचे मार्गदर्शन केले तसेच अध्यक्ष म्हणून लाभलेले आजच्या कार्यक्रमाला नामकरण सोहळ्याला शिवाजीराव मोघे साहेब यांनी केंद्र शासनाच्या विरोधात चालू असलेला त्यांचा प्रयत्न सहकार क्षेत्र कसा संपुष्टात आल्याचं यावर संपूर्ण मार्गदर्शन केले तसेच कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती व सहकार नेते ऍड प्रफुल्लभाऊ मानकर यांनीसुद्धा मार्गदर्शन करून सर्वांना एकत्र राहण्यास सांगितले 28/08/2021 रोजी स्वर्गीय बाबासाहेब मानकर व्यापारी संकुलन म्हणून नामकरण चे प्रसिद्ध नामकरण करण्यात आले त्यामध्ये त्यांनी त्यांच्या परिवारातर्फे सर्वांचे धन्यवाद मानले. या कार्यक्रमाला व्यासपिठावर मा. जिवनभाऊ पाटील,मनिषभाऊ पाटील,अरविंदभाऊ वाढोणकर,प्रशांतभाऊ तायडे,शांमकांतभाऊ येणोरकर,किरणभाऊ कुमरे, विलासबाबु भोयर, ज्येष्ठ नेते पुरूषोतमभाऊ निम्रड,नंदकुमारभाऊ गांधी,मनोजभाऊ मानकर, संजय भाऊ देशमुख ,अरविंदभाऊ फुटाने, अंकुशराव रोहोणकर, जानरावभाऊ गिरी,प्रदीपभाऊ ठुणे,सौ वर्षाताई राजेंद्रभाऊ तेलंगे सौ मंजुषा तेलंगे व संस्थेचे अध्यक्ष मिलिंदभाऊ इंगोले ईत्यादी मान्यवर उपस्थित होते, या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन श्री राजेशभाऊ काळे सर यांनी केले तर आभार खरेदी विक्री संघाचे संचालक श्रावऩसिंगजी वडते सर यांनी मानले,या कार्यक्रमाला तालुक्यातील कांग्रेस पक्षाच्या चाहत्यानी,पदाधिकाऱ्यांनी आवर्जून उपस्थिती दर्शवली होती.