गृहमंत्री अमित शहा यांच्या वादग्रस्त विधांनाच्या निषेधार्थ उपविभागीय अधिकारी यांना दिले निवेदन

संसदेमध्ये देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी केलेले डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विषयी अपमानात्मक वादग्रस्त वक्तव्याबाबत राळेगांव येथील आंबेडकर अनुयायांनी आज दिं २० डिसेंबर २०२४ रोज शुक्रवारला जाहिर निषेध नोंदवत अमित शहा यांनी जाहीर माफी मागावी अशा आशयाचे निवेदन उपविभागीय अधिकारी यांना देण्यात आले आहे.
देशाचे गृहमंत्री श्री. अमित शहा यांनी संसदेत म्हटले होते की, आता “आंबेडकर, आंबेडकर, आंबेडकर, आंबेडकर, आंबेडकर” म्हणण्याची फॅशन झाली आहे, जर तुम्ही देवाचे इतके नाव घेतले असते तर तुम्ही स्वांत असते सात जन्मासाठी. या वादग्रस्त विधानाचा राळेगांव तालुक्यातील समस्त आंबेडकरी जनसमुदाय विधानाचा तिव्र शब्दात निषेध करत देशाचे प्रधानमंत्री मा. मोदी साहेब यांनी त्वरीत गृहमंत्र्याचा राजिनामा घ्यावा व त्यांना पदमुक्त करण्यात यावे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी २ वर्ष ११ महिने १८ दिवस अथक परिश्रम करून देशाचे संविधान बनविले. सर्व राजकिय पक्ष त्यांना आपला आदर्श मानतात हजारो वर्षापासुन अस्पृष्यता आणी जातियवादाने ग्रासलेल्या ८५ टक्के लोकांना न्याय मिळवून देण्याचे काम त्यांनी केले आहे. त्यासाठी ते देवापेक्षा कमी नाहीत अमित शहा यांनी दिलेल्या हास्यास्पद विधानाबाबत माफी मागावी अन्यथा आंबेडकरी अनुयायी देशभर आंदोलन करतील अशा आशयाचे निवेदन राळेगाव येथील आंबेडकर अनुयायांनी उपविभागीय अधिकारी यांना दिलेल्या निवेदनातून केले आहे.