मुख्य बाजारपेठेतील मुत्रीघर पूर्ववत सुरू,युवासेनेचे उपजिल्हाप्रमुख अजिंक्य शेंडे यांच्या प्रयत्नाला यश


वणी शहरातील गोल कमाणितील मुख्य बाजारपेठेत पूर्वीपासून असलेले मुत्रीघर मध्यंतरी नगर पालिका प्रशासनाने बंद करून टाकल्याने बाजारपेठेत येणाऱ्या ग्राहक दुकानदारांना त्रास होऊ लागला त्यामुळे जनतेच्या सेवेसाठी असणारे मुत्रीघर सुरु करण्यात यावे अश्या मागणीची दखल घेऊन युवा सेनेचे उपजिल्हाप्रमुख अजिंक्य शेंडे यांच्या प्रयत्नाला यश आले आहे. आज दिनांक 13 फेब्रुवारी 2023 रोजी नगर पालिकेचे मुख्याधिकारी यांनी गोल कमाणितील मुख्य बाजारपेठेतील मुत्रीघर पूर्ववत सुरू केल्याने बाजारपेठेतील ग्राहक व दुकानदारांनी समाधान व्यक्त केले. परंतु नगर पालिका प्रशासनाने शहरातील बाजारपेठेचा विचार करून शहराच्या मुख्य चौका चौकामध्ये सुलभ सौचालयाची व्यवस्था करावी . वणी हे यवतमाळ जिल्ह्यातील सर्वात मोठी बाजारपेठ असल्याने जवळपास वणी शहरात 70 ते 80 गावातील नागरिक ग्राहक रोज असतात त्यामुळे शहराच्या बाजारपेठेच्या दृष्टीकोणातू स्त्री आणि पुरुषा करीता मुत्रीघराची आवश्यकता आहे तेव्हा प्रशासनाने सुध्दा याबाबीचा विचार करावा अशी अपेक्षा व्यक्त केली आहे परंतु आज नगर पालिका प्रशासनाने युवासेनेचे उपजिल्हाप्रमुख अजिंक्य शेंडे यांच्या निवेदनाची दखल घेऊन गोलकामाणितील मुख्य बाजारपेठेतील मुत्रीघर पूर्ववत सुरू केले आहे त्यामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.