गळफास घेत तरुणाची आत्महत्या


वणी:— नितेश ताजणे


वणी तालुक्यातील पिंपरी (कोल्हार) येथील २१ वर्षीय तरुणाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली.
अनिरुद्ध प्रकाश बोंडे.२१ वर्ष असे आत्महत्या करणाऱ्या तरूणाचे नाव आहे.
अनिरुद्ध बोंडे हा तरुण आई व भावासह पिंपरी येथे राहून दुधाचा व्यवसाय करीत होता.काल दिनांक ३१ ऑक्टोबर रोजी रात्री जेवण करून सर्व जण झोपी गेले. आज त्याचा भाऊ कुणाल यांनी सकाळी उठून बघितले असता, अनिरुद्ध दिसुन आला नाही.म्हणुन त्याने व आईने त्याचा गावात शोध घेतला असता तो मिळून आला नाही.नंतर त्यांनी गाडी,म्हशी बांधन्याच्या गोठ्यात बघितले असता अनिरुद्ध गोठ्यात गळफास घेतलेल्या अवस्थेत लटकुन दिसला.त्यामुळे अनिरुद्ध यांचा भाऊ कुणाला यांनी वणी येथील काका गजानन राजेश्वर बोंडे यांना माहिती दिली.
गजानन बोंडे यांनी वणी पोलिस स्टेशनला तक्रार दाखल केली असता पोलिसांनी मर्ग दाखल करून तपासात घेतला. पुढील तपास वणी पोलिस करीत आहे.
अनिरुद्ध यांनी आत्महत्या का केली हे कळू शकले नाही.