
अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मदतीचा हात देण्यासाठी मनसे उपाध्यक्ष राजू उंबरकर यांनी राजसाहेब ठाकरे अल्पभूधारक शेतकरी दत्तक योजना सुरू करून त्यांना मदतीचा हात दिला आहे. या योजनेअंतर्गत तब्बल दीड हजार शेतकऱ्यांना रब्बी हंगामाच्या लागवडीसाठी हरभरा बियाणे देण्यात येणार आहे. ३ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता वसंत जिनिंगमध्ये बियाणाचे वाटप केले जाईल.
अतिवृष्टीमुळे नदी, नाल्यांना आलेल्या पुरामुळे शेतकऱ्यांच्या शेतातील पिकांचे प्रचंड नुकसान झाले. पुराचे पाणी गावांमध्ये शिरून जनजीवन उद्ध्वस्त झाले होते. शासनाची मदत मिळण्याअगोदरच मनसेच्यावतीने राजु उंबरकर यांच्या नेतृत्वात महाराष्ट्र सैनिकांनी नागरिकांना अत्यावश्यक सुविधा पुरवून सामाजिक बांधिलकी जोपासली होती. तसेच या पुरामुळे शेतातील पिकांचे झालेले नुकसान बघून या शेतकऱ्यांना मदतीची गरज असल्याने उंबरकर यांनी राजसाहेब ठाकरे अल्पभूधारक शेतकरी दत्तक योजना सुरू करून या महत्त्वाकांक्षी योजनेमधून वणी मतदार संघातील गरजू शेतकऱ्यांना रब्बी हंगामासाठी हरभरा बियाणे लागवडीसाठी देण्यात येणार आहे. वसंत जिनिंगच्या सभागृहात शेतकरी मेळाव्याचे आयोजन केले आहे. यासाठी मनसे प्रवक्ते प्रकाश महाजन, मनसे नेते दिलीप धोत्रे, उपाध्यक्ष आनंद एंबडवार उपस्थित राहून शेतकऱ्यांना मार्गदर्शन
करणार आहेत
