
सहसंपादक-रामभाऊ भोयर
राळेगाव तालुक्यात जुन, जुलै २०२२ मध्ये मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी होऊन शेतकऱ्यांच्या शेताचे व घराचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते.अतिवृष्टीमुळे राळेगाव तालुक्यामध्ये हजारो हेक्टर जमिनीतील पिके नष्ट झाली होती तर शेकडो घरांची पडझड झाली होती. यामध्ये शेतकऱ्यांच्या शेतीचे झालेल्या नुकसानीचा काही प्रमाणात मोबदला मिळाले आहे. परंतु गावातील नाल्यालगत, नदीलगत, असलेल्या घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊन सुद्धा अजून पर्यंत त्या लोकांना नुकसानीचा मोबदला देण्यात आला नाही. तर जून ,जुलै २०२२ मध्ये राळेगाव तालुक्यात नदी नाल्यालगत असलेल्या घरातील संपूर्ण वस्तू पाण्याखाली डुबुन पूर्णपणे खराब झाल्या होत्या यामध्ये जीवन उपयोगी लागणाऱ्या सुद्धा वस्तू खराब झाल्या होत्या तर काही लोकांचे शेती उपयोगी खत, युरिया सारख्या हजारो रुपयांच्या वस्तू पाण्यामध्ये वाहून गेल्या तर काही लोकांचे संपूर्ण घरे सुद्धा जमीन दोस्त झाले होते. तर या झालेल्या नुकसानीचे पंचनामे सुद्धा महसूल विभागाने केले होते.परंतु अजून पर्यंत या घरांच्या नुकसानीचा मोबदला या लोकांना देण्यात आला नाही.तर पुन्हा एकदा आसमानी संकट या राळेगाव तालुक्यात कोसळले आहे. यात परिसरात चार ते पाच दिवसाच्या अकाली पावसाने मोठा कहर करून यामध्ये घरांची पुन्हा पडझड झाली आहे.तर जुन, जुलै २०२२ मध्ये झालेल्या नुकसानीचे सर्वे करून सुद्धा पूरग्रस्त लोकांना अजून पर्यंत त्यांचा मोबदला मिळालाच नाही तर आता झालेल्या नुकसानीचा मोबदला कधी मिळणार ? म्हणून असे मनायला काही हरकत नाही शासनाचे काम आणि चार दिवस थांब.
