भारतीय स्टेट.बँक शाखा ढाणकी
येथे शाखा प्रबंधक व कृषी अधीकारी यांची बैठक

उमरखेड तालूका प्रतिनिधी: विलास तुळशीराम राठोड (ग्रामीण )

उमरखेड तालूका अंतर्गत येणाऱ्या ढाणकी शहरातीळ भारतीय स्टेट. बँक शाखा -ढाणकी बँक मॅनेजर माननीय श्री अतुल देशपांडे साहेब व मयुर ठोकळ साहेब रितेश सर, सचिन पराते सर, जगदीश आडे सर, आंगरत्न थोरात सर प्रमोद राठोड सर इतर कर्मचारी यांची बैठक घेतली.माननीय श्री अतुल देशपांडे सरांनी शेतकरी क्रॉप लोन o t c बदल माहिती देण्यात आली या माहिती बदल सर्वानी वन टाईम सेटलमेंट बद्दल चर्चा केली . चर्चा करून डिफाल्डर. O. T. C शेतकऱ्यांची प्रत्येक गावाची यादी बनवून आज रोजी प्रत्येक ग्रामपंच्यातला लावण्यास सांगितले आहे. एस. बी. आय अंतर्गत येणारे गाव .ढाणकी, मेट, निंगनूर, नागेशवाडी, नारळी, टाकली अमडापूर, कुरळी,, सोईट, घमापूर, वालतूर, टेबूरदरा, वाडी, खरूस गांजेगाव, पिरंजी. कोपरा,गोविंदपूर,सावळेश्वर कृष्णपूर, इतर अनेक काही गावे असतील त्या सर्व गाव ग्रामपंचायत ला 0.T. c. डिफाल्डर शेतकऱ्यांची यादी लावलेली आहे. तरी आपण आपल्या ग्रामपंचायत ला जाऊन आपले नाव यादी मध्ये असेलतर दिनांक 30मार्च 2023पर्यंत भारतीय स्टेट बँक शाखा -ढाणकी येथें जाऊन बँक मॅनेजर ला संपर्क साधून आपण आपल्या क्रॉप लोनची Enquiry करून क्रॉप लोन भरणा करून घ्यावा कारण या otc मध्ये आपल्याला काही %टके भरणा करून आपल्याला आपले कर्ज खाते निल करून घ्यायचे आहे .तरी समोर आपला सिबील चांगला ठेवण्यासाठी तसेच कोणत्याही लोन योजना मध्ये अडथळा न येण्यासाठी आपण आपले खाते निल केलेच पाहिजे ही संधी आपल्याला 30मार्च 2023पर्यंत देण्यात आली आहे.