गुरु पौर्णिमा ते राखी पौर्णिमा ” ग्राम संवाद यात्रा मानवता मंदिरातुन केला शुभारंभ-ग्राम स्वराज्य महामंच


राळेगांव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225)

 आज गुरु पौर्णिमा चे औचित्य साधून वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या विचारवाणीतुन मानवतेच्या कल्याणकारी योजना गावा गावात पोहचण्यासाठी ग्राम स्वराज्य निर्माण झाले पाहिजे ही संकल्पना मांडण्यासाठी ग्राम स्वराज्य महामंच नी “ग्राम संवाद यात्रा” चा शुभारंभ मानवता मंदिरातुन आज सुरू केला आहे

ग्राम समृद्धी व्हावे ! शासन सुशासन द्यावे 
जनसेवा शिक्षण द्यावे ! ग्रामनाथा गावोगावी 
 
 ग्राम स्वराज्य महामंच च्या संकल्पनेतून लोक जागृती अभियान सुरू करण्यात आले आहे या अभियानात गावातील समस्या गावातील शासन प्रशासन आणि गावातील अर्थ कारण महिला सक्षमीकरण सुशिक्षित तरुण आणि शेतकरी शेतमजूर यांच्या शी प्रत्येक्ष चर्चा करण्यासाठी ही
” ग्राम संवाद यात्रा ” आहे  गावा गावात जाऊन गावातील लोकांना भेटून चर्चा करण्याचे ठरविले आहे. 

“ग्राम संवाद यात्रा” आजच्या गुरु पौर्णिमा शुभ दिनी मानवता मंदिराचे अध्यक्ष मा.विनायकराव बोदडे मा.मधुसुदनजी कोवे अध्यक्ष ग्राम स्वराज्य महामंच मा.गोविंदराव चव्हाण सचिव स्वतंत्र लोक सोसायटी मा.कृष्णरावजी भोंगाडे जिल्हा अध्यक्ष विदर्भ राज्य आंदोलन समिती यवतमाळ मा.नागोराव काकपुरे अध्यक्ष जिवन विकास परीक्षा यवतमाळ श्रीधरजी ढवस नितीनरावजी ठाकरे अशोकराव गेडाम आणि गुरुदेव सेवक “ग्राम संवाद यात्रा ” शुभारंभ करताना मानवता मंदिरात उपस्थित होते