
सहसंपादक: रामभाऊ भोयर
राळेगाव तालुक्यातील कार्ड धारक लाभार्थ्यांना आनंदाचा शीधा कधी मिळणार असे वृत्त अनेक दैनिकांमध्ये प्रकाशित झाले होते या वृत्ताची दखल घेत संपूर्ण राळेगाव तालुक्यात आनंदाच्या शिधा वाटपाला सुरुवात झाली असल्याचे संबंधितांकडून सांगण्यात येत आहे. सदर मराठी नवर्षाच्या पर्वावर गुढीपाडव्याच्या निमित्त आनंदाचा शिधा वाटप होणार असल्याची घोषणा महाराष्ट्र शासनाच्या वतीने करण्यात आली होती.परंतु गुढी तर उभारली मात्र आनंदाचा शिधा गुढीपाडव्याच्या निमित्ताने वाटप न झाल्याने शासन जनतेची थटा करते की काय ? असा प्रश्न राळेगाव तालुक्यातील नागरिकांनी उपस्थित केला होता. सदर
गुढी पाडवा निमित्त आनंदाचा शिधा वाटप होणार असल्याने नागरिक स्वस्त धान्य दुकानात जाऊन आनंदाचा शिधा मागत होते मात्र अद्याप पर्यंत शासनाकडून आनंदाचा शिधा आलाच नसल्याचा स्वस्त धान्य दुकानदार सांगत असल्याने नागरिकांना आल्या पावली परत जावे लागले होते त्यामुळे नागरिकांकडून रोष व्यक्त होत होता.
नुकताच विधिमंडळात महाराष्ट्रा करीता अनेक सुविधा उपलब्ध करून देण्याच्या घोषित करण्यात आले त्यातच गुढी पाडव्या पासून नागरिकांना आनंदाचा शिधा देणारं असल्याचंहि घोषित झाले होत्या मात्र शिधाच मिळत नाही तर गुढी पाडवा कसला अश्या संतप्त प्रतिक्रिया नागरिक उपस्थित करत होते.
त्या मुळे शासनाचे काम अन चार दिवस थांब असे मनल्यास वावगे ठरणार नाही. अशा प्रतिक्रिया राळेगाव तालुक्यातील सर्वसामान्य माणसांमधून उमटत होते. सदर
गुढी पाडवा हा मराठी माणसानं साठी नवीन वर्ष या दिवसापासून सगळ्या कामांना सुर्वात होते
गुढीपाडव्याच्या दिवशी दाराला तोरण बांधून गोड धोड खाऊन मोठ्या उत्साहात हा सण साजरा केला जातो
मात्र आनंदाचा शिधाचं मिळाला नाही त्या मुळे गुढी पाडव्याच्या सणा पासून मोल मजुरी करणाऱ्या गरीब जनतेला वंचित राहावे लागत होते.सदर
आनंदाच्या शिध्यात 1किलो डाळ, 1किलो साखर, 1किलो रवा, 1किलो तेल, असा शंभर रुपयांत मिळणारा हा आनंदाचा सिधा आहे. परंतु उशिरा का होईना राळेगाव तालुक्यात हा आनंदाच्या शिधा वाटपाला सुरुवात झाल्यामुळे कार्डधारकांमध्ये आनंदाचे वातावरण दिसून येत आहे.
