
यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी रामभाऊ भोयर
राळेगाव ग्रामीण : राळेगाव पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या पिंपळापूर जिल्हा परिषद शाळेचा विध्यार्थी सार्थक रविंद्र बुटे हा ( इ. ५ वी) नवोदय परीक्षेत ९०/ टक्के गुण घेऊन पास झाला आहे, हा विध्यार्थी नवोदय परीक्षेत पासझाल्याने गावामध्ये आनंद मय वातावरण निर्माण झाले आहे. तसेच नेहमी विद्यार्थ्यांची गुणवत्ता व विद्यार्थ्यांच्या अंगी असलेल्या कलागुणाच्या बाबतीत नेहमीच पिंपळापूर येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा अग्रेसर असते. या शाळेचे सर्वच शिक्षक विद्यार्थ्यांची प्रगती वाढवण्यासाठी नेहमी पुढेच असतात हे विशेष! जिल्हा परिषद पिंप्रापूरच्या शाळेचा नेहमी कोणत्याह उपक्रमात अग्रक्रम असतोच व त्यासाठी या शाळेचे सर्व शिक्षक जीव ओतून झटतात. दरवर्षी एन एम एम एस, सांस्कृतिक कार्यक्रम तसेच महादीप परीक्षा तसेच नवोदय मध्ये त्या शाळेचे विद्यार्थी हमखास पास होतात व त्यासाठी या शाळेच्या शिक्षकांचे अतोनात प्रयत्न असतात. यावर्षी सुद्धा सार्थक बुटे नामक विद्यार्थी नवोदय परीक्षेत उत्तीर्ण होऊन जिल्हा परिषद शाळा पिंपळापूरच्या शिरपेच्या मानाचा तुरा रोवला. राळेगाव तालुक्यातून फक्त दोन विद्यार्थी नवोदय परीक्षेत उत्तीर्ण झाले त्यात ग्रामीण भागातील वडकी केंद्रामधील पिंपळापूर शाळेचा एकमेव विद्यार्थी उत्तीर्ण झाला आहे.
यासाठी वर्गशिक्षक राहुल बोरडे यांचे योग्य मार्गदर्शन व अथक परिश्रम यामुळेच हा विद्यार्थी नवोदय परीक्षेत पास झाला. वर्गशिक्षक राहुल बोरडे त्यांना मिळालेली मुख्याध्यापक संदिप कचवे, मंगेश गोडबोले, सचिन कांबळे, अजय पांडे या या सर्व शिक्षकांची साथ व मोलाचे मार्गदर्शन तसेच सार्थक च्या आई-वडिलांची साथ व मार्गदर्शन व सार्थक चे परिश्रम यामुळेच हे शक्य झाले. राळेगाव तालुक्यातून दोन विद्यार्थ्यापैकी वडकी केंद्रातील एकमेव विद्यार्थी म्हणजे सार्थक च्या या यशाने राळेगाव शिक्षण विभाग व पिंपळापुर या गावाच्या यशात मानाचा तुरा रोवला. सार्थक बुटे च्या या यशाबद्दल शिक्षण विभाग व पिंपळापुर गावातून जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा पिंपळापुर च्या सर्व शिक्षकांवर व सार्थक वर अभिनंदनचा वर्षाव होत आहे. तसेच पिंपळापूर शाळेच्या शाळेच्या सर्व शिक्षकांचे त्यांच्या भरीव कामगिरीबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे.
